Reading Time: 2 Minutes (161 words)
15 | 978-81-86184-55-4 | Microwave Khasiyat | मायक्रोवेव्ह खासियत | Usha Purohit | उषा पुरोहित | आजच्या आघाडीच्या पाककृती लेखिका उषा पुरोहित यांची रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली ‘पाहुणचार’ व ‘सुगरणीचा सल्ला’ ही दोन्ही पुस्तके अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि अजूनही या पुस्तकांना मोठा प्रतिसाद लाभत आहे. आता आम्ही सादर करीत आहोत, आधुनिक युगाला आवश्यक असे त्यांचे नवे पुस्तक ‘मायक्रोवेव्ह खासियत’. मायक्रोवेव्ह या विशेष गुण अंगीभूत असलेल्या उपकरणाचा योग्य तो वापर करून जेवणातील सर्व प्रकारचे – पारंपरिक किंवा आधुनिक पदार्थ करता येतात. शिवाय वेळेची बचत, सोय, टापटीप, पदार्थाची चव, अन्नपदार्थांतील गुणधर्मांची जोपासना असे सर्व काही साध्य होते. फक्त त्यासाठी हवी थोडी कल्पकता ! आणि कल्पकता हेच या पुस्तकाचे वैशिष्टये आहे. सूप्स, स्नॅक्स, भाज्या, डाळी, भात-पुलाव, नॉनव्हेज व गोड पदार्थ यांच्या विविध पाककृती यात आहेत. या पुस्तकामुळे आपणास खात्री पटते की ‘मायक्रोवेव्ह’ हे केवळ अन्न गरम करण्याचे साधन नव्हे, तर स्वादिष्ट पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकघराला बहुपयोगी असे वरदान आहे ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 176 | 21.6 | 14 | 1.2 | 240 |
Microwave recipes
|
Recipe | पाककला | 140 | Microwave Khasiyat.jpg | MicrowevaKhasiyatBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.