81 | Naralache Padartha | नारळाचे पदार्थ | Mangala Barve | मंगला बर्वे | समुद्रकिनार्यालगतच्या भागात जरी नारळ मोठया प्रमाणात पिकत असला, तरी नारळ स्वयंपाकासाठी सर्वत्रच विविध प्रकारे वापरला जातो. हा वापर केवळ चवीसाठी किंवा पदार्थातील एक पुरक जिन्नस म्हणून मर्यादित राहिलेला नाही. नारळाचा स्वतंत्रपणे वापर असलेल्या अनेक पाककृतींची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांनी अशा विविध पदार्थांचा शोध घेऊन, अनेक प्रयोग करून केवळ नारळाच्या पदार्थांचे हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकात नारळाचा वापर असलेले अनेक अल्पोपाहाराचे पदार्थ, भात-पुलावाचे विविध प्रकार, तसेच सार-करी यांचा समावेश आहे व त्यासोबत लागणार्या चटण्या, कोशिंबिरी-रायतीही आहेत. नारळाचे विविध गोड पदार्थही पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकामुळे रसिकांना नारळाचे वैशिष्टयपूर्ण पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 120 | 18.5 | 10.5 | 0.5 | 100 |
Recipes made from coconut
|
Recipe | पाककला | 50 | Naralache Padartha.jpg | Naral_padarthaBC.jpg |
शाकाहारी २०२ भात व भाज्या
जगात सर्वत्र भात हा अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे प्रत्येक जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान आहे. प्रस्तुत पुस्तकात भाताच्या पेजेपासून ते विविध प्रकारचे पुलाव, बिर्याणी, खिचडी, वडाभात यांच्या १०१ लज्जतदार रेसिपीज् दिल्या आहेत. आपल्या आहारात भाज्या क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करतात त्यामुळे भाज्यांनाही जेवणात महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांच्या मूळ चवी लक्षात घेऊन रोजच्या स्वयंपाकात करायच्या वेगवेगळ्या १०१ रेसिपीजही या पुस्तकात दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.