66 | Diwaliche Va Sanasudiche Padartha | दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ | Mangala Barve | मंगला बर्वे | हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 80 | 21.6 | 14 | 0.4 | 100 |
Indian festival recipes
|
Recipe | पाककला | 50 | Diwaliche Va Sanasudiche Padartha.jpg | DiwalicheAaniSanasudichePadarthBc.jpg |
विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ
विवाह-समारंभ हा आपल्या घरातील अतिशय आनंदाचा समारंभ. तो जबाबदारीने व यथासांग पार पडावा, त्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. हल्लीच्या कुटुंबात घरात अनुभवी वडीलमंडळी असतात असे नाही. त्यामुळे कुठली कामे व ती कशी करावी ह्याचा प्रश्न अनेकांपुढे पडतो. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे.
लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, घरगुती पत्रे कशी लिहावी, साखरपुडा कसा साजरा करावा, साखरपुडयाला काय मेनू ठरवावा, लग्नपत्रिकेतील मजकूर कसा असावा ह्याविषयी खूप माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.
विवाहविधीसाठी कोणत्या वस्तू व किती प्रमाणात लागतील त्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याखेरीज मंगलाष्टके, उखाणे, मुलीचे मनोगत व रुखवताचे नानाविध प्रकार दिले आहेत. लग्नाच्या वेळी मुलीसाठी काय तयारी करावी तेही सांगितले आहे.
Reviews
There are no reviews yet.