अयोध्या ते वाराणसी
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी
हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.
दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.
दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.
खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’
साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान…
पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली.
पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात् ‘असाही पाकिस्तान!’
– कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून