328 | 978-93-86493-11-8 | Batmimagchi Batmi | बातमीमागची बातमी | खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य | Jayprakash Pradhan | जयप्रकाश प्रधान | हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने… थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते ! अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 220 | 21.6 | 13.9 | 1.1 | 260 |
Renowned senior journalist of Maharastra Times, Mr. Jayprakash Pradhan in this interesting book has narrated the story of how he used to get exclusive social, criminal and political news for his newspaper. This book reveals an interesting journey of exclusive news in the news paper. How do the journalist get such news? He has given some really sensational stories and their backdrop. What were the special sources in getting those stories.
|
Others | इतर | Literature | ललित | 200 | Batami magachi Batami Cover | Batami magachi Batami CoverBC.jpg |
इति आदि
दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास
अरुण टिकेकर
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….
या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”
Reviews
There are no reviews yet.