Reading Time: 2 Minutes (158 words)
478 | 978-93-80361-80-2 | Baag Ek Jagna | बाग एक जगणं | sarooj deshpande | सरोज देशपांडे | बाग फुलवणं म्हणजे यात्रिंकपणे माती खणून रोप लावणं नव्हे. बाग गॅलरीतली असो वा अंगणातली, प्रत्येक रोपाशी, फुलाशी, वेलीशी भावनिक नातं कसं जुळू शकतं हे या पुस्तकात दिसतं. पानाफुलांशी, लहान मोहक पक्षीसृष्टीशी, गुलाबाच्या कलमांशी आणि कॅक्टससारख्या कातेरी झाडाशीदेखील लेखिकेचा मूक संवाद सुरू असतो. लँडस्केप करताना एखद्या कलाकाराप्रमाणे लेखिका कल्पनेत चित्र रंगवते. मग लँडस्केप ही तिची प्रयोगशाळाच बनुन जाते! नैनिताल असो की जपान, देशविदेशातील बागांचा अनुभव घेतानाही लेखिकेच्या भावविश्वात घरची बाग असतेच. बाग फुलवताना झाडाच्या स्वभावावरून, प्रतिसादावरून जीवनाच्या विविध पैलूंकडे बघण्याची व्यापक दृष्टी लेखिकेला लाभत जाते. जोडीदाराबरोबरचं सहजीवन, माणसाचं पर्यावरणाशी असलेलं नातं जीवनाच्या मोठ्या कॅनव्हासवर बघताना बागेबरोबरचं हे जगणं अधिकाधिक समृध्द वाटू लागतं. अतिशय संवेदनशीलतेने लिहीलेलं हे अनुभवकथन मनोवेधक तर आहेच, पण जाताजाता झाडारोपांच्या, फुलापानांच्या खासियती आणि निगराणी यांचा परिचय करून देणारंही ठरतं. बागेशी जडलेल्या अनुबंधाचा मुक्त आविष्कार म्हणजे… बाग एक जगणं…! |
Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 112 | 200 | Bag Ek Jagna10.jpg | Bag Ek JagnaBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.