गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘ भन्नाट ‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट .. पॉन्झी स्कीम्स !
करोना मुळे प्रथम ‘लॉकडाउन’ घोषित केला गेल्यावर पहिल्या आठ दिवसांत शहरातील सामान्य नागरिकांच्या मनाची झालेली घालमेल ते सैरभैर होऊन गावाकडे निघालेल्या विस्थापित श्रमिकांची झालेली परवड अशा विविध घडामोडींची दोन भिन्न आकृतिबंधामधून नोंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन दीर्घकथा .अचानक निर्माण झालेल्या असामान्य स्थितीमुळे परस्परांतील विश्वास वाढतो की , संदेह बाजूला ठेवण्यास माणसं सहजप्रवृत्त होतात, त्याचा वेध घेऊ पाहणारी संदेहकथा … लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य.
पक्ष्यांचे थवे काही एक सामंजस्याने मार्गक्रमण करत असतात. ” त्या आठ दिवसांत जनजीवनात अचानक संभवलेल्या बदलांनी तेही सैरभैर झाले. स्थलांतरित, नागरी, जंगली, निवासी अशा विविध पक्ष्यांनी मिळून लोकशाही पद्धतीने समिती गठित केली आणि त्या बदलांचा धांडोळा’ घेतला ! पक्षीगणाच्या नजरेतून दिसून आलेली स्थिती चितारणारी विहंगावलोकनी रूपककथा …
चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…
१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?
२. रेशो अॅनालिसिस म्हणजे काय?
३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?
४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?
५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?
६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?
याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!
सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यांनी या पुस्तकात आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं हे व्यवहारातल्या साध्या-सोप्या उदाहरणांमधून समजावून सांगितलं आहे.
हे सांगताना डॉ. लांबा यांनी योग्य वित्तव्यवस्थापन कसं करावं, नफा-तोटा-पत्रक, बॅलन्स शीट कशी समजून घ्यावी, मार्जिनल कॉस्टिंग, टॉप लाइन व बॉटम लाइन, लीव्हरेज आदींसारखे किचकट वाटणारे विषयही सहजसोप्या शब्दांत रंजक पध्दतीने विशद केले आहेत.
त्यामुळे स्वत:चा व्यवसाय असलेले व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक, बँक अधिकारी, विद्यार्थी तसेच या विषयात रस असलेले जिज्ञासू अशा सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, हे निश्चित!
”आज ना उद्या प्रत्येकाला हे नक्की पटेल की कोणताही
व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणि
वित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं असतं.”
-अनिल लांबा
आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!
गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…
एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च
अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.
बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.
मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !