340.00

अयोध्या ते वाराणसी

भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत


लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथच्या मंदिरापासून अयोध्येच्या दिशेने काढलेली रथयात्रा मुंबईत आली, तेव्हापासूनच्या या प्रवासाकडे 'दिसलं तसं, बघितलं जसं...' या नजरेने पाहणारा पत्रकार.. पुढे अयोध्येत बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर १९९२-९३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या दंग्यांचा साक्षीदार. उत्तर प्रदेशातील १९९९ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१४ मध्ये वाराणसी मतदार संघातील घडामोडींचं प्रत्यक्ष भेट देऊन विश्लेषण. लोकसभा (२०१९ ) बिहार विधानसभा उत्तर प्रदेश ( २०१७ ), गुजरात ( २००७ ) यांचं प्रत्यक्षदर्शी विश्लेषण. 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता त्यातून मुंबई महानगराची जडणघडण तसंच शिवसेना यांच्याविषयीच्या कुतुहलाचं अभ्यासात रूपांतर. शिवसेनेच्या पहिल्या तीन दशकांच्या इतिहासाचा प्रथमच विवेचक आढावा घेणारं पुस्तक, 'जय महाराष्ट्र' १९९ ७ मध्ये प्रकाशित. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्याच पुस्तकाचं पुनर्लेखन. राजकारणी, नोकरशहा आणि बिल्डर यांचं साटंलोटं उघड करणारं 'मुंबई ऑन सेल' पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित. 'म.टा.' मध्ये तीन दशकं राजकीय तसंच सांस्कृतिक बातमीदारीबरोबरच महानगरी, झोत, प्रसंग, बहर, पेनड्राइव्ह अशा विविध सदरांचे लेखन. 'झोत' याच नावानं निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह व भेटलेल्या अनेक सुहृदांचा आणि आठवणींचा कोलाज 'मित्रमयजगत' ही पुस्तकं प्रकाशित. सनदी अधिकारी एस. एस. गिल यांच्या 'करप्शन ऑफ पॅथॉलॉजी' या ग्रंथाचा 'भ्रष्टांगण' तर ज्युलियन क्रेडॉल हॉलिक यांनी गंगोत्री ते कोलकाता असा प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकाचा 'गंगा' याच शीर्षकानं अनुवाद. सध्या 'सकाळ' माध्यम समूहात राजकीय संपादक .

भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…
हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !

Reading Time: <1 Minutes ([wp-word-count] words)

978-93-92374-46-3 Ayodhya Te Varanasi अयोध्या ते वाराणसी भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत Prakash Akolkar प्रकाश आकोलकर Papar Back Book Rohan Prakashan Marathi

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.