अयोध्या ते वाराणसी

भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत


लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथच्या मंदिरापासून अयोध्येच्या दिशेने काढलेली रथयात्रा मुंबईत आली, तेव्हापासूनच्या या प्रवासाकडे 'दिसलं तसं, बघितलं जसं...' या नजरेने पाहणारा पत्रकार.. पुढे अयोध्येत बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर १९९२-९३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या दंग्यांचा साक्षीदार. उत्तर प्रदेशातील १९९९ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१४ मध्ये वाराणसी मतदार संघातील घडामोडींचं प्रत्यक्ष भेट देऊन विश्लेषण. लोकसभा (२०१९ ) बिहार विधानसभा उत्तर प्रदेश ( २०१७ ), गुजरात ( २००७ ) यांचं प्रत्यक्षदर्शी विश्लेषण. 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता त्यातून मुंबई महानगराची जडणघडण तसंच शिवसेना यांच्याविषयीच्या कुतुहलाचं अभ्यासात रूपांतर. शिवसेनेच्या पहिल्या तीन दशकांच्या इतिहासाचा प्रथमच विवेचक आढावा घेणारं पुस्तक, 'जय महाराष्ट्र' १९९ ७ मध्ये प्रकाशित. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्याच पुस्तकाचं पुनर्लेखन. राजकारणी, नोकरशहा आणि बिल्डर यांचं साटंलोटं उघड करणारं 'मुंबई ऑन सेल' पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित. 'म.टा.' मध्ये तीन दशकं राजकीय तसंच सांस्कृतिक बातमीदारीबरोबरच महानगरी, झोत, प्रसंग, बहर, पेनड्राइव्ह अशा विविध सदरांचे लेखन. 'झोत' याच नावानं निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह व भेटलेल्या अनेक सुहृदांचा आणि आठवणींचा कोलाज 'मित्रमयजगत' ही पुस्तकं प्रकाशित. सनदी अधिकारी एस. एस. गिल यांच्या 'करप्शन ऑफ पॅथॉलॉजी' या ग्रंथाचा 'भ्रष्टांगण' तर ज्युलियन क्रेडॉल हॉलिक यांनी गंगोत्री ते कोलकाता असा प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकाचा 'गंगा' याच शीर्षकानं अनुवाद. सध्या 'सकाळ' माध्यम समूहात राजकीय संपादक .

भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…
हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !




$4.42 Add to cart

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध


निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.

ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.


$2.47 Add to cart