190.00

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध


निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.

ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.


172 978-93-80361-49-9 Aksharnishthanchi Mandiyali अक्षरनिष्ठांची मांदियाळी Aroon Tikekar अरुण टिकेकर ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-किभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले. Paper Back Books Rohan Prakashan Marathi 176 18.5 10.5 0.5 100 About reading Literature ललित 175 akshar.jpg Aksharnishthanchi MandiyaliBC.jpg
Weight 100 g
Dimensions 18.5 × 10.5 × 0.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.