81-86184-97-4 | Sahelya Ithlya Tithlya | सहेल्या इथल्या – तिथल्या | आशा दामले | चार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो ? या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या | book | Rohan Prakashan | marathi | 96 | ललित | 60 |
मनःपूर्वक खुशवंत
जीवन, मरण आणि त्या दरम्यान…
खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे
* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’
* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’
* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’
निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!
Reviews
There are no reviews yet.