978-9392374-38-8 | vishwamitra Syndrome | विश्वामित्र सिन्ड्रोम | Pankaj Bhosle | पंकज भोसले | विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे. पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं. गणेश मतकरी |
Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | कथा कादंबरी | 325 |
महात्म्याच्या प्रतीक्षेत
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी कोणतंही कर्तव्य नसलेला श्रीराम भारतीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतो. निवांत व सुखासीन आयुष्य जगणारा श्रीराम तिला भेटल्यानंतर त्याने विचारही केला नसेल अशा प्रकारचं आयुष्य जगतो.
भारती बुद्धिमान, तडफदार आणि देशाला वाहून घेतलेली व्यक्ती आहे. त्याउलट हा सामान्य, दिशाहीन आणि कोणतंही ध्येय नसलेला! त्यामुळे दोघांमध्ये होणाऱ्या संवादात एक प्रकारची खुसखुशीत जुगलबंदी वाचायला मिळते.
आर.के. नारायण यांनी गांधीजीची व्यक्तिरेखा या कादंबरीत विविध पैलूंमधून रेखाटली आहे. एकाचवेळी गांधीजी स्वातंत्र्य लढ्यातले लोकप्रिय लोकनेते आहेत, भारतीचे सर्वेसर्वा आहेत तर श्रीरामच्या दृष्टीने त्याच्या व भारतीच्या लग्नाला संमती देणारी एक महत्त्वाची व्यक्ती आहे. अशा सर्वच व्यक्तिरेखांचं रंगतदार चित्रण आर. के. नारायण या कादंबरीत प्रभावीपणे करतात आणि त्याचबरोबर अनेक घटना व प्रसंगांद्वारे कथेतील उत्कंठाही वाढवत नेतात.
Reviews
There are no reviews yet.