258 | 978-93-82591-55-9 | Tintorettocha Yeshu ani 1 Katha | टिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा… १. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्यावर रक्ताचे डागही सापडतात…! २. जगप्रसिध्द चित्रकार टिंटोरेट्टोचं एक चित्र चित्रकार चंद्रशेखर यांना भेट मिळालेलं असतं. त्या चित्राची किंमत काही लाखांमध्ये असते. वारसा हक्काने त्या चित्राचे हक्क चंद्रशेखर यांच्या मुलाकडे असल्याने चित्र पाहण्यासाठी तो चुलतभावाकडे – नवकुमार यांच्याकडे येतो. तेव्हाच घरातल्या एका म्हातार्या कुत्रीचा ‘खून’ होतो. तपासात फेलूदाला कळतं की, ते चित्र बनावट आहे! खर्या चित्राचा शोध घेत फेलूदा पोहोचतो थेट हाँगकाँगला …’टिंटोरेट्टोच्या येशू’च्या शोधात! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 160 | 18.3 | 12.3 | 0.6 | 140 | Film Director and writer Satyajit Ray wrote Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. The plots involve murder, intrigue and narrated in racy, humorous style. The locales range from Kedarnath to Hongkong. Each mystery and its solution makes for enormously entertaining fare! | किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Fiction | कथा-कादंबरी | 125 | FeludaCover_Tintorettocha_RGB | TintorettochaYeshuBC.jpg |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १
प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.