207 | 978-93-80361-87-1 | R.K. Narayan (Set of 4 Books) | आर.के. नारायण संच | ४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच | R.K. Narayan | आर.के. नारायण | मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
संचात असलेली ४ पुस्तकं : १. द इंग्लिश टीचर २. द बॅचलर ऑफ आर्टस ३. मालगुडीचा नरभक्षक ४. महात्म्याच्या प्रतीक्षेत… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 764 | 21.8 | 14.2 | 4.1 | 980 | R. K. Narayan is one of the most famous & widely read Indian novelists. His writing style is marked by simplicity & subtle humour. His stories are grounded in a compassionate humanism & celebrated the humour & energy of ordinary life. He began his career with Swami & Friends. The movie, Guide based on his novel The Guide & T.V. serial Malgudi Days were very popular. We are presenting marathi translation of 4 of his famous & popular books. 4 Books set- 1. The Bachelor of Arts 2. The English Teacher 3. Malgudicha Narbhakshak 4. Mahatmyachya Pratikshet |
मोहर | Combo Sets | पुस्तक संच | Fiction | कथा-कादंबरी | 640 | RKNBox.jpg | RKN_BoxBC.jpg |
गाइड
आर. के. नारायण
अनुवाद : उल्का राउत
आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.
एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं?
एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?
मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?
यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!
Reviews
There are no reviews yet.