203 | 978-93-80361-83-3 | The Bachelor of Arts | द बॅचलर ऑफ आर्ट्स | R.K. Narayan | आर.के. नारायण | ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत. ‘प्रेम’ या भावनेचा खर्या अर्थाने विचार करायला लावणारी ही कथा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा चंद्रन या कथेचा नायक. आर.के. नारायण यांनी प्रेमात आकंठ बुडालेला चंद्रन आणि प्रेमभंगानंतरचा भरकटत जाणारा चंद्रन हा विरोधाभास खूपच सुंदर रेखाटला आहे. ‘प्रेम म्हणजे काय?’ याचा साक्षात्कार करून देणार्या अनेक घटना व प्रसंग या कादंबरीत वाचायला मिळतील. अल्लड व स्वच्छंदी आयुष्य जगणारा हा नायक ‘प्रेम’ या मृगजळामागे धावतो, ती गोष्ट मिळत नाही तेव्हा विरक्त, संन्यासीही होतो. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे जिवंत व्यक्तिरेखा, आशयसंपन्न कथेचा गाभा आणि हळुवार व मार्मिक विनोदशैली हे सर्व या कादंबरीतही प्रत्ययास येते. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 167 | 21.6 | 14 | 0.7 | 220 | This is the story of Chandran, a young man in his last year at college when the novel opens. Life, half-planned, is before him. Love, as yet half-glimpsed, like the fleeting green sari on the river bank that sends his imagination running, makes of Chandran for a long while an exile from Malgudi, from his friends, his family and from life itself. And love is the catalyst that makes him turn back to all that which he had turned his back on. The reader enters a subtle and rewarding world bright with the colour of difference. |
मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 160 | TheBachelorofArts.jpg | RKN3_TheBachelorofArtsBC.jpg |
आचार्यांच्या खुनाचं प्रकरण + १ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. ‘भारत ऑपेरा’ या नाटक कंपनीत काम करणारे इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल, अशी भीती आचार्य यांना वाटत असते; होतंही तसंच! आणि मग आचार्यांच्या खुनाचं प्रकरण अधिकच गूढ-गहिरं होत जातं…
२. ख्यातनाम चित्रपटकर्ता पुलक घोषाल यांनी लालमोहनबाबूंच्या एका कादंबरीवर चित्रपट तयार करायचं ठरवलेलं असतं. त्यात लालमोहनबाबूंना लहानशी भूमिकाही दिलेली असते. शूटिंग दार्जिलिंगला असल्याने लालमोहनबाबू फेलूदा आणि तपेशलाही सुट्टी घालवण्यासाठी तिथे घेऊन जातात. फेलूदाही एकही काम न स्वीकारता, सुट्टीची मजा लुटायची असं ठरवतो. पण ज्या घरात त्यांचं शूटिंग होणार असतं, त्या घराच्या मालकाचा खून होतो आणि मग फेलूदाला दार्जिलिंगमधील खुनाचं रहस्य सोडवावंच लागतं!
Reviews
There are no reviews yet.