285 | 978-93-82591-77-1 | Acharyanchya Khoonach Prakaran + 1 Katha | आचार्याच्या खुनाचं प्रकरण + १ कथा | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. ‘भारत ऑपेरा’ या नाटक कंपनीत काम करणारे इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल, अशी भीती आचार्य यांना वाटत असते; होतंही तसंच! आणि मग आचार्यांच्या खुनाचं प्रकरण अधिकच गूढ-गहिरं होत जातं… २. ख्यातनाम चित्रपटकर्ता पुलक घोषाल यांनी लालमोहनबाबूंच्या एका कादंबरीवर चित्रपट तयार करायचं ठरवलेलं असतं. त्यात लालमोहनबाबूंना लहानशी भूमिकाही दिलेली असते. शूटिंग दार्जिलिंगला असल्याने लालमोहनबाबू फेलूदा आणि तपेशलाही सुट्टी घालवण्यासाठी तिथे घेऊन जातात. फेलूदाही एकही काम न स्वीकारता, सुट्टीची मजा लुटायची असं ठरवतो. पण ज्या घरात त्यांचं शूटिंग होणार असतं, त्या घराच्या मालकाचा खून होतो आणि मग फेलूदाला दार्जिलिंगमधील खुनाचं रहस्य सोडवावंच लागतं! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 160 | 17.9 | 12.1 | 0.8 | 110 | Film Director and writer Satyajit Ray wrote Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. The plots involve murder, intrigue and narrated in racy, humorous style. The locales range from Kashmir to London. Each mystery and its solution makes for enormously entertaining fare! |
किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Fiction | कथा-कादंबरी | 125 | AcharyanchyaKhunachPrakaranFeluda_Golden_1_RGB | AcharyanchaKhunBC.jpg |
काळेकरडे स्ट्रोक्स
प्रणव सखदेव
उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…
आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!
कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !
Reviews
There are no reviews yet.