361 | 978-93-86493-45-3 | Ghanagard | घनगर्द | Rushikesh Gupte | हृषीकेश गुप्ते | हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.
ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. ‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून हृषिकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही. मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही. पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल. याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं. – निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून) |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 236 | 21.9 | 14 | 1.5 | 320 | Collection of stories by well known author Rushikesh Gupte. The stories are written depicting the intricate anxieties of humans. | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 250 | GhanagardCoverartwork | Ghanagard_backBC.jpg |
निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा
माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”
बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!
मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’
Reviews
There are no reviews yet.