287 | 978-93-82591-79-5 | Londonmadhye Feluda + 2 Katha | लंडनमध्ये फेलूदा व इतर २ कथा | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा… १.उच्चभ्रू वर्गातला एक देखणा माणूस फेलूदाकडे मदत मागायला येतो. लहानपणी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, काढलेल्या फोटोतला एक मित्र नक्की कोण आहे, याचा त्याला शोध घ्यायचा असतो. मग ही शोधमोहीम फेलूदाला घेऊन जाते थेट लंडनमध्ये! २.सोनाहाटीला फेलूदा यांची श्रीयुत बोराल यांच्याशी भेट होते. त्यांच्याशी बोलताना असं कळतं की, त्यांच्याकडे अत्यंत दुर्मीळ असा गुलाबी मोती आहे, ज्याची माहिती फारशी कोणाला नाही. पण त्याची बातमी वर्तमानपत्रात येते! आणि मग बोराल यांच्याकडून तो मोती विकत घेण्यासाठी धनाढ्यांचे फोन येऊ लागतात. काय असेल या गुलाबी मोत्याचं रहस्य? ते फेलूदाला उकलता येईल? ३.मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मुन्शी यांनी लिहिलेली डायरी लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित होणार असते. त्यात त्यांनी पेशंट्सची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांच्या नावांऐवजी ‘अ’, ‘र’ अशी अक्षरं दिलेली असतात. जेव्हा त्यांच्या पुस्तकाबद्दल वर्तमानपत्रात बातमी छापून येते, तेव्हा मात्र त्यांना धमकीची पत्रं येऊ लागतात… आणि मग फेलूदा हुशारीने डॉ. मुन्शींच्या डायरीत लपलेलं रहस्य शोधून काढतो! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 168 | 18.1 | 12.2 | 0.8 | 120 | Film Director and writer Satyajit Ray wrote Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. The plots involve murder, intrigue and narrated in racy, humorous style. The locales range from Kashmir to London. Each mystery and its solution makes for enormously entertaining fare! |
किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Fiction | कथा-कादंबरी | 125 | LondonMadheFeluda_Golden_3 | LondonMadheFeludaBC.jpg |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ३
साळिंदराचा काटा आणि इतर ३ कथा
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.