₹250.00
मर्डर इन माहीम
कवी, कादंबरीकार, अनुवादक आणि पत्रकार म्हणून जेरी पिंटो प्रसिद्ध आहेत. ते मुंबईत राहतात. ‘एम अँड द बिग हूम' या त्यांच्या ‘द हिंदू लिटररी प्राईझ आणि द क्रॉसवर्ड बुक अॅवॉर्ड फॉर फिक्शन’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे तसंच, ‘हेलन : द लाईफ अँड टाइम्स ऑफ अँन एच –बॉम्ब’ या चित्रपटविषयक सर्वोत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ते लेखक आहेत. प्रसिद्ध मराठी लेखक दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मचरित्राचा तसंच, मल्लिका अमरशेख यांच्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रपर लेखनाचा आणि वंदना मिश्रा यांच्या ‘मी मिठाची बाहुली’ या आत्मकथनाचा इंग्लिश अनुवाद त्यांनी केला आहे. जेरी पिंटो यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं असून त्यांना येल युनिव्हर्सिटीच्या विन्डहॅम-कॅम्पबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.
माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास… क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं !
इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते – ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया…यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता…शत्रुत्व…स्पर्धा… मैत्री…क्रौर्य…अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते.
संवेदनशील पत्रकार आणि प्रतिभावान लेखक जेरी पिंटो यांचं मानवी नातेसंबंधांतल्या अनेक कंगोऱ्यांचा वेध घेणारं आणि ‘अस्वस्थ’ मुंबईचं वास्तव दर्शन घडवत एका खुनाच्या मुळाशी जाणारं… मर्डर इन माहीम !
Reviews
There are no reviews yet.