978-93-80361-02-4 | Ghartyatlya Chimnya | घरट्यातल्या चिमण्या | Vasumati Dhuru | वसुमती धुरू | वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे . सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात …. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत . आठवणी आहेत . त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे ; पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही . या पुस्तकात भेटणाऱ्या स्त्रिया तशा सामान्य आहेत , तरीही परिस्थितीवर स्वार होणाऱ्या आहेत … लेखिकेला बदलत्या काळाची , बदलत्या मूल्यांची जाणीव आहे . ती निवेदनात व्यक्तही झाली आहे . कधी स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी अपेक्षांमधील विनोदही निवेदिकेला जाणवतो … दादरमध्ये अनेकांच्या परिचयाच्या असलेल्या प्रभावती बापटाचे व्यक्तिचित्र आणि ‘ पूरणसाव ‘ हे वेगळे व्यक्तिचित्र वाचत असताना लेखिकेची स्वत : ला प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात येते . ‘ त्यांच्या शेवटच्या इच्छा’मध्ये अंत्यसंस्कारांविषयीचे पुरोगामी विचार , अनेक व्रतस्थ माणसांचे अखेरच्या दिवसात तोल जाणे याची चिकित्सा हे लेखनातील प्रगल्भ आविष्कार आहेत . तसेच प्रेमलग्ने कशी होतात आकर्षण म्हणजे काय ? हे किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्नही आले आहेत . ‘ कोणासारखी होशी गं मुली ? ‘ सारख्या नर्मविनोदी कथेतील वटसावित्रिचे व्रत गमतीचे आहे .. दादरमधील त्या काळातल्या जीवनाचे चित्र रेखाटताना स्मरणरंजनाच्या सहजप्रेरणेला आवर घालत हे लेखन केले आहे . त्यातील तपशील मोलाचा आहे , पण त्यापलिकडे लेखिकेचा दृष्टिकोन अधिक मोलाचा आहे . – पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून | paper back | Book | Rohan Prakashan | Marathi | ललित साहित्य |
अक्षरनिष्ठांची मांदियाळी
ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
अरुण टिकेकर
ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.
Reviews
There are no reviews yet.