वसुमती धुरू

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या पदवीधर असलेल्या वसुमती धुरू यांचा ‘आहारशास्त्रा’चा विशेष अभ्यास आहे. या विषयात त्यांनी पदविकाही संपादन केली आहे. चायनीज कुकरी हा त्यांचा आवडता विषय. इतकेच नव्हे, तर चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवत. त्यामुळे त्यांच्या व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. विविध विषयांवर त्यांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

लेखकाची पुस्तकं

घरट्यातल्या चिमण्या

 

[taxonomy_list name=”product_author” include=”4848″]


वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे . सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात …. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत . आठवणी आहेत . त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे ; पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही . या पुस्तकात भेटणाऱ्या स्त्रिया तशा सामान्य आहेत , तरीही परिस्थितीवर स्वार होणाऱ्या आहेत … लेखिकेला बदलत्या काळाची , बदलत्या मूल्यांची जाणीव आहे . ती निवेदनात व्यक्तही झाली आहे . कधी स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी अपेक्षांमधील विनोदही निवेदिकेला जाणवतो … दादरमध्ये अनेकांच्या परिचयाच्या असलेल्या प्रभावती बापटाचे व्यक्तिचित्र आणि ‘ पूरणसाव ‘ हे वेगळे व्यक्तिचित्र वाचत असताना लेखिकेची स्वत : ला प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात येते . ‘ त्यांच्या शेवटच्या इच्छा’मध्ये अंत्यसंस्कारांविषयीचे पुरोगामी विचार , अनेक व्रतस्थ माणसांचे अखेरच्या दिवसात तोल जाणे याची चिकित्सा हे लेखनातील प्रगल्भ आविष्कार आहेत . तसेच प्रेमलग्ने कशी होतात आकर्षण म्हणजे काय ? हे किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्नही आले आहेत . ‘ कोणासारखी होशी गं मुली ? ‘ सारख्या नर्मविनोदी कथेतील वटसावित्रिचे व्रत गमतीचे आहे .. दादरमधील त्या काळातल्या जीवनाचे चित्र रेखाटताना स्मरणरंजनाच्या सहजप्रेरणेला आवर घालत हे लेखन केले आहे . त्यातील तपशील मोलाचा आहे , पण त्यापलिकडे लेखिकेचा दृष्टिकोन अधिक मोलाचा आहे . – पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून


100.00 Add to cart

आहाराविषयी सारे काही

आपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक


वसुमती धुरू


आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!
हे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.
थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…



225.00 Add to cart

केक्स व कुकीज्


वसुमती धुरू


तुमच्याकडे ओव्हन-मिक्सर असो वा नसो, रुचकर व खमंग केक घरी बनवा! या पुस्तकात केक्स, आयसिंग, ब्रेडस, बिस्किट्स, नानकटाई इ. तसेच खास डाएटसाठी विशिष्ट केक्स व कुकीजच्या साध्या सोप्या रेसिपीज!


80.00 Add to cart

चिंगलान

चायनीज कुकरी


वसुमती धुरू


पाककृती व आहारशास्त्र यांचा संगम साधणार्‍या लेखिका सौ. वसुमती धुरू यांनी हे चायनीज कुकरीवर खास लिहिलेले पुस्तक. चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवीत त्यामुळे व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. चायनीज जेवणाला ‘भारतीय टच’ देऊन लेखिकेने केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज् विशेषत: अजिनोमोटोसारखा आरोग्याला घातक पदार्थ वगळून बनवलेले सूप्स, सॉस, सॅलड, रोल्स, राइस, नूडल्स यांची मेजवानी!


Chinese Recipes


60.00 Add to cart

जासुस मुन्ना


वसुमती धुरू


मुलांनो, या गोष्टीत तुम्हाला भेटतील काही आगळे-वेगळे मित्र-मैत्रिणी ० ओसाडगावात राहून गावजेवण घालणारी हौशी सोनाबाई ० चोराला बेधडकपणे पकडणारी वीरबाला ० देशाचे महत्त्वाचे कागदपत्र शिताफीने हस्तगत करणारा खादाड मुन्ना ० गुपिताच्या आशंकेने व्याकूळ झालेली छोटी मिनी ० यमाच्या रेड्याचा रोष ओढवून घेणारे दिग्या, पम्या, रम्या ० सदा आनंदी जोडपं- लकीभट आणि गुणाबाई ० ‘ज्युपिटर’च्या खोडया आणि निनाद ० परमेश्‍वराकडे विचित्र वरदान मागून सर्वांचं भलं साधणारे फादर उलीनो ० प्रसिद्ध लेखिकेला घरी जेवायला बोलावणार्‍या अनू आणि सरू ० सारखे प्रश्‍न विचारणारा निरागस छोटू या गोष्टी वाचा, इतरांना सांगा. पाहा या सर्वांच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल. या मित्रांचे तुमच्याशी काही साम्य आहे का तेही पाहा.


35.00 Read more

सडपातळ व्हा सडपातळ राहा

वजन घटविण्यासाठी अनेक उपाय व उपचारपध्दती तसेच बांधेसूद राहण्यासाठी सौम्य आहारनियमनाच्या शास्त्रशुध्द पाककृती


वसुमती धुरू


आपले शरीर बांधेसूद असावे, आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषास वाटत असते. परंतु ते साधायचे कसे?
-स्वत:ची उपासमार करून घेऊन,
-की न झेपेल इतका व्यायाम करून,
-की फसवी अद्भुत औषधे घेऊन?
आहारशास्त्राच्या अभ्यासक व दीर्घ अनुभव असलेल्या लेखिका वसुमती धुरू आपणास सर्व पर्यायांची माहिती देतात आणि सौम्य व्यायामाचे प्रकार, चालणे तसेच शास्त्रशुध्द सौम्य आहारनियमन कसे करावे? हे समजावून देतात. आहारनियमनाच्या विविध पाककृती देऊन लेखिकेने सिध्दांताला प्रात्यक्षिकांचीही जोड दिली आहे. या पुस्तकामुळे बांधेसूद, सुडौल राहण्याचे आपले इप्सित साधणे सोपे होईल.


175.00 Add to cart

सॅलड्स व कोशिंबिरी

वसुमती धुरू


कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.


60.00 Add to cart