अतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे.
वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
माहितीरूप गोष्टीतून गुनेह्गारी मानसिकतेचा वेध घेणारी अतुल कहते लिखित ३ पुस्तकं….
अतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे.
वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘ भन्नाट ‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट .. पॉन्झी स्कीम्स !
एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.
मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.
दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी!
या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका… या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो.
अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर…
तरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.
पी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता.
संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो.
राव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना ,या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध, त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे पुस्तक घेतं.
एका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी… नरसिंहावलोकन!
डॉ. हॅपीमॉन जेकब यांनी भारतीय परराष्ट्र धोरण, संरक्षण, काश्मीर समस्या आणि भारत पाकिस्तान संबंध या विषयांवर अनेक पुस्तकं आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत. ते दिल्लीच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये 'डिप्लोमसी अँड डिसआर्मामेंट' या विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. 'द हिंदू 'या दैनिकाचे स्तंभलेखक म्हणून आणि त्याचप्रमाणे, 'ग्रटर काश्मीर' या वृत्तपत्रांसाठी त्यांनी अनेक विद्वत्तार्ण लेख लिहिले आहेत. त्याचप्रमाणे, 'द वायर' या वृत्त संकेतस्थळावर ते सातत्याने राष्ट्रीय विषयावरील कार्यक्रमांचं संयोजन करत असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांततापूर्ण संबंध राहावेत, या उद्देशाने 'ट्रॅक-२' संवादांच्या माध्यमांतून ते गेली अनेक वर्षं प्रयत्नशील आहेत. 'चाओ फ्रया इंडिया पाकिस्तान डायलॉग', 'पगवाश इंडिया - पाकिस्तान डायलॉग' आणि 'ओटावा डायलॉग ऑन इंडिया - पाकिस्तान न्युक्लीअर रिलेशन्स' या तीन परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरावर ख्यातकीर्त असलेल्या जेकब यांनी महत्त्वाच्या विषयांवर विद्वत्तापूर्ण पुस्तकं लिहिलेली आहे.
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर
‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.
दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.
दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.
मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.
गहाण पडलेली इस्टेट सोडवून घेऊन यशवंतराव आणि त्यांचं कुटुंब दुमजली वाड्यात राहायला येतं … … आणि मग सुरू होतो … भयप्रद आणि गूढ गोष्टींचा अनाकलनीय खेळ ! गांगरून टाकणारा भासांचा लपंडाव !! यशवंतरावांचा परिवार , दोन भाडेकरू , गूढ व्यक्तिमत्त्वाचे डॉ . नागराणी , रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी उमाबाई , सतत भीतीच्या छायेत वावरणारा त्यांचा भाचा मुकुंद पित्रे , यांच्याभोवती फिरणारं कथानक एका मोठ्या रहस्यभेदापर्यंत येऊन पोचतं … कोणाचा भास होत राहतो ? कोण वावरतंय त्या वाड्यात ? एक थरारक भयकथा अंगारिका ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !
Reviews
There are no reviews yet.