419 | 978-93-86493-63-7 | Ha Ye Mumkin Hai | हा ये मुमकीन हे! | एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष | Dr. Taru Jindal | डॉ. तरु जिंदल | Rama Hardikar-Sakhdeo | रमा हर्डीकर-सखदेव | प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…
हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल ! भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है । |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 286 | 22 | 14 | 1.5 | 320 | समाजरंग | Social | सामाजिक | 325 | HaYeMumkinHaicover | HaYe Mumkin HaiBC.jpg |
ऋणानुबंध
भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं, घडलेल्या घटना…
यशवंतराव चव्हाण
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर मौलिक असे काही छंद आणि काही श्रध्दा मिळून जातात.
वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.
म्हणूनच…
अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबध्दही…
Reviews
There are no reviews yet.