401 | 978-93-86493-79-8 | Isro : Zep Navya Kshitijakade | इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे | मी अनुभवलेलं एक अभूतपूर्व स्वप्न | R. Aravmudan | Geeta Aravmudan | आर. आरवमुदन | गीता आरवमुदन | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | डॉ. विक्रम साराभाई यांनी ६०च्या दशकात काही तरुण इंजिनिअर्सना आणि शास्त्रज्ञांना आपल्या चमूत घेऊन एक बीज रोवलं होतं. त्यात रामभद्रन आरवमुदन हा पंचविशीचा तरुणही होता. त्यांच्यापुढे आव्हान ठेवलं होतं ते एक रॉकेट लाँचिंग केंद्र उभारण्याचं. आणि या तरुणांनी हे आव्हान स्वीकारून अशक्य वाटणारं हे काम शक्य करून दाखवलं होतं. न केवळ भारतीयांसाठी, तर जगासाठीही ते एक आश्चर्य होतं… आणि मग द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं स्वप्न साकारू लागलं – ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’चं अर्थात ‘इस्रो’चं!
या पुस्तकात आरवमुदन ‘इस्रो’ कशी घडत गेली याचे तपशील देऊन त्यासाठी हातभार लागलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्याही सांगतात. तसंच ‘इस्रो’ने राबवलेले प्रकल्प कसे साकारत गेले, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट घ्यावे लागले, किती अपयशं झेलावी लागली याची रोचक माहितीही ते देतात. रॉकेट लॉंचिंग स्टेशन ते ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प राबवणाऱ्या ‘इस्रो’चा हा वटवृक्ष कसा उभारत गेला याचं रंजक कथन पुस्तकातून आपल्यापुढे येतं. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठ़ी आपलं तन-मन-धन अर्पिणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडिया’ कहाणी…इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 186 | 21.6 | 14 | 1.3 | 240 | Science | विज्ञान | Informative | माहितीपर | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | 250 | ISRO | ISROBC.jpg |
लालबहादुर शास्त्री
राजकारणातील मर्यादापुरषोत्तम
सी.पी. श्रीवास्तव
अनुवाद :अशोक जैन
काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !
…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!
Biography of Shri.Lal Bahadur Shastri
Reviews
There are no reviews yet.