295.00

त्या दहा वर्षांतील गुरु दत्त

अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


९-१० ऑक्टोबर, १९६४
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी)

__

गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ”इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,” असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले… ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते.

त्या दहा वर्षांतील गुरू दत्त
– गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश
– अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ व ‘साहिब बीबी और गुलाम’सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध


Reading Time: 3 Minutes (315 words)

268 978-93-82591-31-3 Tya Daha Varshatil Guru Datt त्या दहा वर्षांतील गुरु दत्त अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध Satya Saran सत्या सरन Milind Champanerkar मिलिंद चंपानेरकर ९-१० ऑक्टोबर, १९६४
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी)__गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ”इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,” असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले… ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते.

त्या दहा वर्षांतील गुरू दत्त
– गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश
– अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ व ‘साहिब बीबी और गुलाम’सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 259 21.6 14 1.5 350 In Ten Years with Guru Datt: Abrar Alvi’s Journey , Sathya Saran looks at the tumultuous yet incredibly fecund relationship between the mercurial director and his equally talented albeit unsung writer, a partnership that evolved over a decade till Guru Dutt’s tragic death in 1964. Starting his career as a driver and chaperone to Guru Dutt’s producer on the sets of Baaz, Abrar soon caught the attention of the director with his sharp ear for and understanding of film dialogue. व्यक्तिरंग Biographical चरित्र-आत्मचरित्र Cinema – Music चित्रपट – संगीत 295 GuruDutt_RGB GuruDutt_BackBC.jpg
Weight 350 g
Dimensions 21.6 × 14 × 1.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.