सत्या सरन

सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

लेखकाची पुस्तकं

एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


[taxonomy_list name=”product_author” include=”499″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”404″]


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…



300.00 Add to cart

अनफर्गेटेबल जगजित सिंग

गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर


सत्या सरन
अनुवाद: उल्का राऊत


जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.


270.00 Add to cart

त्या दहा वर्षांतील गुरु दत्त

अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध


सत्या सरन
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


९-१० ऑक्टोबर, १९६४
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी)

__

गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ”इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,” असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले… ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते.

त्या दहा वर्षांतील गुरू दत्त
– गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश
– अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ व ‘साहिब बीबी और गुलाम’सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध


295.00 Add to cart
Featured

सून मेरे बंधु रे

एस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत


सत्या सरन
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;
गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.
अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी
केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.
`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी
असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…
`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी
त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी…
त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’



425.00 Add to cart