978-93-92374-61-6 | Ek hoti Ritu | एक होती रितू | रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी | satya Saran | सत्या सरन | Neeta Kulkrani | नीता कुलकर्णी | रितू नंदा…..
राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी….पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही… हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे. सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व, व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं…. मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती. तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू… |
Crad Binding | Book | Rohan Prakashan | मराठी | 251 | चरित्र | ३०० |
लालबहादुर शास्त्री
राजकारणातील मर्यादापुरषोत्तम
सी.पी. श्रीवास्तव
अनुवाद :अशोक जैन
काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !
…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!
Biography of Shri.Lal Bahadur Shastri
Reviews
There are no reviews yet.