एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :

‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…


300.00 Add to cart

भटकंती संच २ पुस्तकांचा


‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच जगाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.

■ कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?

४ जॉर्जियामधील ऑटम कलर्स, तेथील प्राचीन अवशेष, स्टॅलिनचं जन्मगाव

अझरबैजानमधील इचेरी शेहरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग ● अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश

★ नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश

युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना

● प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस

• फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश ‘अँडोरा’

■ कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ?

• स्पेनमधले बॅलेअरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे,

• ११५ लहान-मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स,

● जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई,

• ग्रीस मधली पांढरी निळी बेट, v लहान-मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून

झालेला व प्राचीन वारसा असलेला इंडोनेशिया १५ नयनरम्य निसर्ग सौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेट…..


 

500.00 Add to cart

जीवनकोंडी


संपादन : 

परेश जयश्री मनोहर मूळचा भटक्या आहे , मनाच्या कोअरमध्ये कार्यकर्ता .... भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेसोबत गेली वीस वर्षं काम करतोय . सामाजिक कामाला वाहिलेल्या टाटा ट्रस्टच्या Deta Driven Governance टीममध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून नोकरी करतो . भवताल बघत असतो , अस्वस्थ असतो , व्यक्त होतो आणि कामही करतो .


राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….

ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….

त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….


250.00 Add to cart

रेड लाइट डायरीज…ख़ुलूस


समीर रावसाहेब गायकवाड सोलापूर येथे वास्तव्यास. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे मूळ गाव. शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.ए. (मराठी) उत्तीर्ण झाल्यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही प्राध्यापकी पेशा न स्वीकारता शेती, व्यवसायावर उदरनिर्वाह. विविध विषयांवर लिहिताना भिन्न साहित्यप्रकारात लेखन. विख्यात दैनिकांत, नियतकालिकांत विपुल स्तंभलेखन. सातत्यपूर्वक ब्लॉगलेखन. वेश्यांच्या जीवनाचे अप्रकाशित पैलू समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न, संलग्न माहिती विविध सरकारी यंत्रणांना पुरवतानाच या समस्येकडे समाजाचे भान वळवण्यासाठी समाज माध्यमांत हेतूतः लेखन. साहित्यनिर्मिती करत असतानाच सामाजिक जाणिवांतून घटनांवर पोटतिडकीने परखड भाष्य.  

रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !

अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.

खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !


300.00 Add to cart