एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :

‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…


300.00 Add to cart

राज कपूर- दि मास्टर अॅट वर्क


मूळ लेखक:

राहुल रवैल हे एक अग्रणी भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि पुढे अनेक वर्षं त्यांचे राज कपूर यांच्याशी निकटचे संबंध राहिले आणि साहचर्य राहिलं. रवैल हे त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या 'लव्ह स्टोरी' (१९८१), 'बेताब' (१९८३), 'अर्जुन' (१९८५), 'डकैत' (१९८७), 'अंजाम' (१९९४), आणि 'अर्जुन पंडित' (१९९९) यांसारख्या चित्रपटांसाठी विशेष ज्ञात आहेत. बॉलीवूडमधील अनेक नवोदित कलाकारांचं पदार्पण साध्य करणारे दिग्दर्शक म्हणूनही त्यांना श्रेय दिलं जातं; त्यांत कुमार गौरव आणि विजयता पंडित ('लव्ह स्टोरी'), सनी देओल आणि अमृता सिंग ('बेताब'), परेश रावल ('अर्जुन'), काजोल ('बेखुदी') आणि ऐश्वर्या राय ('और प्यार हो गया') यांचा समावेश होतो.

शब्दांकन :

इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर प्रणिका शर्मा यांनी प्रकाशन व्यवसायात आपला प्रवास सुरू केला. क्रिएटिव्ह रायटिंग'मध्ये स्नातकोत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्यापूर्वी त्या मास मीडिया व पत्रकारिता या क्षेत्रातही कार्य करत होत्या. सध्या त्या 'सागा फिक्शन' या 'मोबाइल रीडिंग अॅप'च्या सह-संस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

अनुवाद :

गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


राहुल रैवल हे माझ्या वडलांचे घनिष्ट मित्र, माझे आवडते दिग्दर्शक आणि माझे आजोबा राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक. माझ्या आजोबांनी त्यांच्या अल्पशा पण दर्जात्मकदृष्ट्या श्रेष्ठ अशा जीवनकालात कोणता अनमोल कलात्मक वारसा मागे ठेवला आहे, याची जाणीव या पुस्तकाने मला करून दिली.

-रणबीर कपूर

राज कपूर यांच्या अवघ्या प्रतिभेची उकल करून दाखवणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या चित्रपटांतील गीतं गाण्याचा बहुमान मला लाभला होता. त्यांची संगीताची सखोल समज आणि त्यांचं त्याबाबतचं आकलन असं सर्व मला नेहमीच अचंबित करत असे. गाणं कसं चित्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्या गाण्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे सर्व ते एक दिग्दर्शक या नात्याने अत्यंत खोलात जाऊन आम्हाला समजावून सांगत असत.

-लता मंगेशकर

राज कपूर यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे चित्रपट आणि त्यांचं स्वतःचं एक विश्व याबाबत विस्मयकारक अंतर्दृष्टी देणारं असं हे पुस्तक… आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीनेच ते लिहिलेलं असल्याने ते वाचताना खिळवून ठेवतं.

-राजकुमार हिरानी

मला राहुल रवैल यांचा हेवा वाटतो… हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटून गेलं की, ‘मूव्ही मसीहा’ राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती. त्यांच्या आजूबाजूला राहिल्यानेच समृद्ध करणारे त्यांचे गुण, त्यांची उत्कटता राहुलजी आत्मसात करू शकले. राहुलजींच्या या प्रवासात जरूर सहभागी व्हा. मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्यासारखाच आनंद अनुभवाल.

-रमेश सिप्पी

केवळ चित्रपट निर्माते किंवा चित्रपट माध्यमाचे विद्यार्थी यांच्यासाठीच नव्हे, तर ज्या कुणाला सर्जनशीलतेच्या क्षेत्रात खोलवर बुडून बारकावे समजून घ्यायचे असतील, त्या सर्वांसाठी हे एक ‘मास्टर क्लास’ पुस्तक ठरतं. मला या पुस्तकाने खिळवून ठेवलं.

-इम्तियाज़ अली


 

595.00 525.00 Add to cart