978-3-92374-66-1 | Raj Kapoor master at work | राज कपूर दि मास्टर अॅट वर्क | Rahul Raival | मिलिंद चंपानेरकर | राहुल रैवल हे माझ्या वडलांचे घनिष्ट मित्र, माझे आवडते दिग्दर्शक आणि माझे आजोबा राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक. माझ्या आजोबांनी त्यांच्या अल्पशा पण दर्जात्मकदृष्ट्या श्रेष्ठ अशा जीवनकालात कोणता अनमोल कलात्मक वारसा मागे ठेवला आहे, याची जाणीव या पुस्तकाने मला करून दिली. रणबीर कपूरराज कपूर यांच्या अवघ्या प्रतिभेची उकल करून दाखवणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या चित्रपटांतील गीतं गाण्याचा बहुमान मला लाभला होता. त्यांची संगीताची सखोल समज आणि त्यांचं त्याबाबतचं आकलन असं सर्व मला नेहमीच अचंबित करत असे. गाणं कसं चित्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्या गाण्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे सर्व ते एक दिग्दर्शक या नात्याने अत्यंत खोलात जाऊन आम्हाला समजावून सांगत असत. लता मंगेशकरराज कपूर यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे चित्रपट आणि त्यांचं स्वतःचं एक विश्व याबाबत विस्मयकारक अंतर्दृष्टी देणारं असं हे पुस्तक… आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीनेच ते लिहिलेलं असल्याने ते वाचताना खिळवून ठेवतं. राजकुमार हिरानीमला राहुल रवैल यांचा हेवा वाटतो… हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटून गेलं की, ‘मूव्ही मसीहा’ राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती. त्यांच्या आजूबाजूला राहिल्यानेच समृद्ध करणारे त्यांचे गुण, त्यांची उत्कटता राहुलजी आत्मसात करू शकले. राहुलजींच्या या प्रवासात जरूर सहभागी व्हा. मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्यासारखाच आनंद अनुभवाल. रमेश सिप्पीकेवळ चित्रपट निर्माते किंवा चित्रपट माध्यमाचे विद्यार्थी यांच्यासाठीच नव्हे, तर ज्या कुणाला सर्जनशीलतेच्या क्षेत्रात खोलवर बुडून बारकावे समजून घ्यायचे असतील, त्या सर्वांसाठी हे एक ‘मास्टर क्लास’ पुस्तक ठरतं. मला या पुस्तकाने खिळवून ठेवलं. इम्तियाज़ अली |
paper back | book | Rohan Prakashan | Marathi |
हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान
एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत
अनुवाद :
प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!
Reviews
There are no reviews yet.