458 | 978-93-89458-33-6 | Unforgettable Jagjit Singh | अनफरगेटेबल जगजित सिंग | Satya Saran | सत्या सरन | Ulka Raut | उल्का राऊत | जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला. सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले. एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग. |
Paperback | book | Rohan Prakashan | Marathi | 164 | 18.5 | 12 | 0.8 | 250 | Biography of Jagjit Singh | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Cinema – Music | चित्रपट – संगीत | 250 | JagjitSinghCoverNew.jpg | Jagjit SinghBC.jpg |
कारेनामा
[taxonomy_list name=”product_author” include=”1728″]
औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.
Reviews
There are no reviews yet.