24 | 978-81-86184-95-0 | Ward no. 5, KEM | वॉर्ड नंबर पाच, केईएम | Dr. Ravi Bapat | Sunitee Jain | डॉ. रवी बापट | सुनीती जैन | ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज… डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 301 | 21.6 | 14 | 1.5 | 360 | Biography of Dr.Ravi Bapat | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Social | सामाजिक | 325 | Ward no. 5, KEM.jpg | Ward5BC.jpg |
हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान
एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत
नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!
Reviews
There are no reviews yet.