डॉक्टर आणि लेखक म्हणून डॉ. रवी बापट सुपरिचित आहेत. त्यांनी मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये बराच काळ प्राध्यापकी केली असून ते केईएम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात कार्यरत. त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रा. एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसंच हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना महत्त्वाचे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या लेखनाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…
शरदिन्दु बंद्योपाध्याय यांचा जन्म ३० मार्च १८९९मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे झाला. त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९१९ साली प्रसिद्ध झाला. त्या वेळी ते कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील महाविद्यालयात शिकत होते. ते हॅरिसन रोड (आताचा महात्मा गांधी रोड) वरील एका मेसमध्ये राहात होते. मेसमधील त्यांची खोली हे व्योमकेश बक्षीचेही पहिले घर ठरले. कायदेशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर त्यांनी लेखनास वाहून घेतलं. पहिली व्योमकेश बक्षी कथा त्यांनी लिहिली ती १९३२ साली. तोवर ते नामवंत लेखक झालेले होते. १९३८ साली ते मुंबईला आले आणि 'बॉम्बे टॉकीज' व नंतर अन्य कंपन्यांसाठी पटकथा लेखन करू लागले. १९५२पर्यंत ते मुंबईत होते. मग पटकथालेखन त्यांनी थांबवलं आणि पुन्हा ललित लेखनाकडे वळण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी बंगालीत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा आणि बालकथा देखील लिहिल्या आहेत. उर्वरीत आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं आणि २२ सप्टेंबर १९७०मध्ये त्यांचं निधन झालं.
बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.
व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.
व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.
निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!