469 | 978-93-82591-33-7 | Solavya Varshich Mount Everest Fatte | सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते! | Arjun Vajpeyee | अर्जुन वाजपेयी | Sumati Kanitkar | सुमती कानिटकर | दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर २२ मे २०१० रोजी सोळा वर्षांचा अर्जुन वाजपेयी जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभा होता! त्यावेळेस एव्हरेस्ट सर करणारा तो सर्वात तरुण (नॉन-शेरपा) गिर्यारोहक ठरला होता. अनेक वर्षं जोपासलेलं असं अशक्यप्राय स्वप्न अर्जुनने त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूर्ण केलं होतं… हे अनुभवकथन थेट अर्जुनच्याच शब्दात असल्यामुळे ते वाचताना वाचकही त्याच्याबरोबर एव्हरेस्ट मोहिमेवर निघतो, त्याच्याबरोबर ते सर्व कठीण टप्पे पार करतो आणि अक्षरश: एका धाडसी गिर्यारोहकाचं आयुष्यच जगतो! केवळ गिर्यारोहणात रस असणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटी आणि धाडस याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. एक अतिशय सामान्य असा सोळा वर्षांचा गिर्यारोहक अशक्यप्राय स्वप्न धाडसाने आणि जिद्दीने कसं पूर्ण करतो याचं चित्तथरारक अनुभवकथन… ‘सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते!’ |
पेपरबॅक | Book | Rohan Prakashan | Marathi | 104 | 120 | 95 | Solavya Varshi Mount Everest Fatte_RGB | Solavya Varshi Mount Everest Fatte_BackBC.jpg |
अनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ४ कथा…
१. किमती वस्तूंचे संग्रहालय असलेल्या राजनबाबूंना एके दिवशी छापील अक्षरं कापून तयार केलेलं धमकीचं पत्र येतं… नंतर एक मुखवटाधारी माणूसही त्यांना घाबरवून सोडतो. कोण असेल हा ‘दार्जिलिंगचा धोका’दायक माणूस?
२. कैलास चौधरींना आलेल्या एका निनावी पत्रात त्यांच्याकडचं एक मौल्यवान रत्न विशिष्ट ठिकाणी आणून देण्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि तपास करताना फेलूदासमोर येतं ‘कैलास चौधरींच्या रत्ना’ विषयी एक अनपेक्षितच सत्य!
३. किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबू यांना इजिप्तशियन चित्रलिपीत लिहिलेलं एक पत्र येतं. त्यात धमकी तर नाहीये ना, याचा शोध घेताना दुसर्या एका संग्राहकाकडचीही इजिप्तशियन मूर्ती चोरीला जाते. चित्रलिपीसारखं गूढ वाटणारं ‘अनुबिसचं रहस्य’ फेलूदा कसं सोडवेल?…
४. राधारमण समाद्दार या काहीशा श्रीमंत, विक्षिप्त पण बुध्दिमान संगीतवाद्य संग्राहकाचे अखेरच्या क्षणी शब्द असतात – ”माझ्या नावात… किल्ली… किल्ली…!” या ‘किल्ली’त दडलेलं रहस्य फेलूदा कसं उकलेल?
Reviews
There are no reviews yet.