150.00

फिटनेस मंत्र टीनएजर्ससाठी


गेली २५ वर्षं नमिता जैन या फिटनेसच्या क्षेत्रात काम करत आहेत, तसंच त्याविषयी विविध वृत्तपत्रांमधून तसंच नियतकालिकांमधून लेखनही करत आहेत. आरोग्यदायी खाणं आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणं या तत्त्वावर त्यांचा भर असतो, तो त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधूनही मांडलेला आहे. त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आरोग्यविषयक तज्ज्ञ सल्लागार असून तिथं त्या व्यायामाचे, जीवनशैली बदलण्याचे आणि वजन कमी करण्याचे सेशन्स घेतात. तसंच त्यांनी 'फेमिना मिस इंडिया २०१२'च्या स्पर्धेत आहारतज्ज्ञ म्हणून कामही केलं होतं.

अनुवाद :
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाद्वारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!

‘हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’
-सायना नेहवाल

‘या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’
-दीपिका पदुकोण


Reading Time: 3 Minutes (253 words)

219 978-93-82591-01-6 Fitness Mantra Teenagerssathi फिटनेस मंत्र टीनेजर्ससाठी Namita Jain नमिता जैन Dr. Arun Mande डॉ. अरुण मांडे फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!’हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’
-सायना नेहवाल’या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’
-दीपिका पदुकोण
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 198 21.6 14 0.9 210
Who doesn’t want to look good? And what if you could also learn the secret to a healthy lifestyle? This indispensable handbook tells you how to fight the fat, rate your fitness quotient, remodel your body, build up stamina, snack sensibly, tackle body changes during puberty, get the coveted 6 – pack abs and most importantly stay fit even if you hate exercising.
Health आरोग्य Parenting पालकत्व Young Adult किशोरसाहित्य 150 ‘Fitness Mantra’ Teenagerssathi_L Fitness Mantra_BC.jpg
Weight 210 g
Dimensions 21.6 × 14 × 0.9 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.