312 | 978-81-932936-7-6 | Ruskin Bond Set | रस्किन बाँड संच | भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता | Ruskin Bond | रस्किन बाँड | सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात. त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं, त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी ! तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल… तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 684 | 22.5 | 14.5 | 5.4 | 1220 | Thirty nine unforgettable tales of fascinating human encounters with animals and birds-of a man-eater that terrorizes an entire village; a strange and wonderful trust that develops between a fierce leopard and a boy; revengeful monkeys who never forgive a woman who grows dahlias; a crow who genuinely thinks human beings are stupid; and many others-creating a world in which men and wild creatures struggle to survive despite each other: a world where, in the end, one is not quite sure which side one is on. Another marvellous collection of stories from India’s most-loved author that will once again amuse, enchant and delight children of all ages. |
किशोरवाचन | Combo Sets | पुस्तक संच | Young Adult | किशोरसाहित्य | 900 | Ruskin_bond_sanchBox | Ruskin_sanch_backBC.jpg |
आमचं बालपण
गौरी रामनारायण
अनुवाद : उल्का राऊत
बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’
Reviews
There are no reviews yet.