22 | 978-81-86184-78-3 | Abhyas Kaushalya | अभ्यास कौशल्य | Dr. Nandini Diwan | डॉ. नन्दिनी दिवाण | अभ्यास आणि परीक्षा या विद्यार्थिजीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात तर परिक्षेतल्या यशाला मोठे महत्त्व आले आहे, त्या दृष्टीने अभ्यासाची योग्य पध्दती समजावून घेणे आवश्यक ठरते. अभ्यास-कौशल्य म्हणजे काय? श्रवण, वाचन, स्मरणशक्ती, लेखन इत्यादी घटकांचा योग्य वापर कसा करावा? परीक्षातंत्र कसे विकसित करावे? त्यात पालकांची भूमिका काय असावी? या सर्व गोष्टींचे मानसशास्त्राच्या साक्षेपी प्राध्यापिका डॉ.नन्दिनी दिवाण यांनी या पुस्तकात सुलभ मार्गदर्शन केले आहे. तसेच या संदर्भात सर्वांगीण व्यक्तिमत्त्व-विकासाबद्दलही काही सूचना दिल्या आहेत. शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिकण्याची वा शिकवण्याची आवड असणार्या सर्वांनाच हे पुस्तक मोलाचे ठरावे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 21.6 | 14 | 0.4 | 100 |
How to bring up the study acumen of a child
|
Educational | शैक्षणिक | 100 | Abhyas Kaushalya.jpg | Abhays kaushalyaBC.jpg |
नंदनवनातील धोका व इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. माहितोष रॉय यांना धमकी देणाया चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीअंती फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वीच एका नटाच्या बदल्यात रॉय यांना ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने रॉय यांच्या सख्ख्या भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो अप्सरा थिएटर प्रकरणात!
२. फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू काश्मीरला फिरायला जायचं ठरवतात. तिथे त्यांची ओळख माजी न्यायाधीश मलिक यांच्याशी होते. मलिक हे शिक्षा दिलेल्यांच्या आत्म्यांशी संवाद साधतात आणि त्यांनी दिलेली शिक्षा योग्य होती की नाही, हे पडताळून पाहतात. अचानक फेलूदावर हल्ले व्हायला सुरुवात होते, आणि मलिक यांची निर्घृण हत्या केली जाते. आणि समोर उभा राहतो – नंदनवनातील धोका!
३. लखनौला जाताना फेलूदाची श्रीयुत बिश्वास यांच्याशी ओळख होते. त्यांच्या घराण्याचा रंजक इतिहास ऐकताना असं समजतं की, एकेकाळी प्रसिद्ध असलेली नटी शकुंतला यांचा कंठहार त्यांच्याकडे जपून ठेवलेला आहे. एके दिवशी तो हार अचानक गायब होतो. पण मौल्यवान असलेला शकुंतलेचा कंठहार फेलूदा ‘युक्ती’ने शोधून काढतो!
Reviews
There are no reviews yet.