153 | 978-93-80361-36-9 | Fantastic Feluda Green Set(6 books) | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा ग्रीन सेट | ६ पुस्तकांचा संच | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!० दफनभूमितील गूढ ० गणेशाचे गौडबंगाल ० काठमांडूतील कर्दनकाळ ० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 675 | 18.5 | 12.5 | 3.2 | 600 | 6 individual suspense novels for teens | किशोरवाचन | Combo Sets | पुस्तक संच | Young Adult | किशोरसाहित्य | 450 | fantastic Feluda Green Set (6 Books).jpg |
MBA @ वय वर्ष 16
शाळा व कॉलेजच्या दिवसांपासूनच व्यवस्थापन व व्यवसायाचे बाळकडू
सुब्रोतो बागची
अनुवाद :उल्का राऊत
सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!
या उपक्रमानंतर मनीषासारख्या ३१ मुला-मुलींचं जीवनच बदलून गेलं…अनेक उद्योजक या विद्यार्थ्यांचे हिरो बनले.
आजच्या या जनरेशनपुढे नोकरी-व्यवसायाचे अनेक पर्याय खुले आहेत. पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत् म्हणजे नक्की काय हे माहीत असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जागं व्हावं यादृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा एक आगळा प्रयोग केला आहे.
बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योगविश्वाची, प्रसिध्द उद्योजकांची व व्यवसायातील विविध संज्ञा-संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक…
Reviews
There are no reviews yet.