नमिता जैन

गेली २५ वर्षं नमिता जैन या फिटनेसच्या क्षेत्रात काम करत आहेत, तसंच त्याविषयी विविध वृत्तपत्रांमधून तसंच नियतकालिकांमधून लेखनही करत आहेत. आरोग्यदायी खाणं आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणं या तत्त्वावर त्यांचा भर असतो, तो त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधूनही मांडलेला आहे. त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आरोग्यविषयक तज्ज्ञ सल्लागार असून तिथं त्या व्यायामाचे, जीवनशैली बदलण्याचे आणि वजन कमी करण्याचे सेशन्स घेतात. तसंच त्यांनी 'फेमिना मिस इंडिया २०१२'च्या स्पर्धेत आहारतज्ज्ञ म्हणून कामही केलं होतं.

लेखकाची पुस्तकं

ऑफिसमध्ये रहा फिट


नमिता जैन
अनुवाद : डॉ. अरुण मांडे 


मीटिंग्ज… कामानिमित्त प्रवास… सतत बाहेरचं खाणं… डेडलाइन्स… आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव!
…ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं – बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार – अशी अनियमित जीवनशैली.
या पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच ‘फास्ट लाइफस्टाइल’मुळे उद्भवणार्‍या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी ‘प्रॅक्टिकल’ व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.


125.00 Add to cart

चार आठवडयात वजन कमी करा!


डॉ. नमिता जैन
अनुवाद: डॉ. अरूण मांडे


तुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.
लेखिका डॉ.नमिता जैन या प्रसिद्ध‌ आहार व स्वास्थ्यतज्ज्ञ आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही चित्र-विचित्र शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा उत्कृष्ट डाएट प्लॅन तयार केला आहे.

या डाएट प्लॅनची वैशिष्ट्यं म्हणजे-
+ वैयक्तिक गरजेनुसार आहारात बदल.
+ या प्लॅनमध्ये कोणतेही न ऎकलेले पदार्थ नाहीत.
+ तुम्हाला कोणताही बेचव आणि अनाकर्षक आहार घ्यावा लागणार नाही.
+ हे पदार्थ तुमच्या नेहमीच्या भाज्या व मसाले वापरून करता येण्यासारखे आहेत.
+ या डाएट प्लॅनमधले पदार्थ कमी तेलाचे आणि कमी उष्मांक असलेले तरीही चविष्ट आहेत.

पुस्तकाची इतर वैशिष्ट्यं आहेत-
+ घरी करता येण्यासारखे व्यायाम
+ वजन कमी करण्याविषयीची माहिती
+ दैनंदिन जीवनातील अनुभवांची उदाहरणं

मग वाट कसली बघताय? आजच हा डाएट प्लॅन सुरू करा आणि चार आठवडयात शिडशिडीत फिगर बनवा!


200.00 Add to cart

फिटनेस मंत्र टीनएजर्ससाठी


नमिता जैन
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाद्वारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!

‘हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’
-सायना नेहवाल

‘या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’
-दीपिका पदुकोण


150.00 Add to cart