300 | 978-93-82591-97-9 | Tumcha Saccha Sathidar | तुमचा सच्चा साथीदार | व्यवसाय किंवा नोकरी-धंद्यातील प्रगतीसाठी… | Subroto Bagchi | सुब्रोतो बागची | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात?सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी ‘द प्रोफेशनल’ (मराठी आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्या गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.या पुस्तकात त्यांनी चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती दिली आहे. तसंच हे गुण आपल्या अंगी कसे बाणवावेत, ते अधिकाधिक विकसित कसे करावेत, हे आपलं आपल्यालाच समजावं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारले आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी पुस्तकात मोकळ्या जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला सामोरे जावे लागणारे, आपल्या क्षमतांचा कस लावू पाहणारे वेगवेगळे घटना-प्रसंगही देण्यात आले आहेत. त्या घटना-प्रसंगांत तुम्ही कसं वागाल, काय कृती कराल हे पुस्तकात लिहायला सांगितलं आहे. कधीकधी आधी दिलेल्या उत्तरांचं पुनरावलोकन करायलाही सांगितलं आहे.‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 160 | 21.7 | 15.4 | 1.2 | 240 |
In this do-it-yourself workbook that is meant as a companion volume to Tumcha Saccha Sathidar, Bagchi takes you through simple exercises that allow you to understand how professional your approach is in a given context, and helps you develop a wider skill set and a more committed outlook.
Tumcha Saccha Sathidar is your very own personalized guide to excelling in today’s world. |
Business | व्यवसाय | Self – Help |
व्यक्तिमत्व विकास
|
195 | Tumcha_saccha_sathidar | TumachaSachhaSathidarcoverBC.jpg |
स्टार्टअप मंत्र
स्टार्टअप मंत्र अर्थात नवोद्योगाची ओळख
सुरेश हावरे
तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप! अभिनव संकल्पना किंवा आयडिया, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं जातं.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्यं : १५ यशस्वी उद्योजकांशी संवाद : स्टार्टअप्सच्या संकल्पना, त्यांची अंमलबजावणी आणि विस्तार होण्यापर्यंतचा प्रवास
प्रथितयश व सर्जनशील उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांचे अनुभवाचे बोल व मार्गदर्शन
यशस्वी स्टार्टअप्सची १० सूत्रं आणि मौल्यवान टिप्स
एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!
Reviews
There are no reviews yet.