डॉ. आशुतोष जावडेकर

संगीत, साहित्य, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये लीलया मुशाफिरी करणारं तरुण व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. आशुतोष जावडेकर यांची ख्याती आहे. त्यांनी दंतवैद्यकाची पदवी घेतलेली असली तरी त्यासोबतच त्यांनी इंग्रजी साहित्यात प्रथम क्रमांकासह एम.ए केलं आहे. डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाङ्मय हे प्रधान अभ्यासविषय असून त्यावरील त्यांचा इंग्रजी शोधनिबंध प्रसिद्ध आहे.
संगीतविषयक पुस्तकांबरोबर त्यांनी कादंबरीलेखन केलं असून या पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत. याशिवाय त्यांनी संगीतकार व गायक म्हणून तीन संगीत व्हिडिओंची निर्मिती केली आहे. मुंबई विद्यापीठ, मदुरा कॉलेज (मदुराई), आयआयएएस (सिमला) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) इत्यादी ठिकाणी इंग्रजीमध्ये साहित्य विषयावर प्रमुख.

लेखकाची पुस्तकं

वा! म्हणताना

डॉ. आशुतोष जावडेकर


‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’

– डॉ. आशुतोष जावडेकर

साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…


250.00 Add to cart