पुरस्कारांच्या निमित्ताने…(भाग-२)
कोणत्याही विषयावरील पुस्तकांची निर्मिती करताना ती विचारपूर्वकच करावी. त्या प्रक्रियेसोबत 'फ्लर्टिंग' शक्यतो करू नये. मग ते पुस्तक कथा-कादंबरी प्रकारचे असो, चरित्रात्मक असो, माहितीवजा असो किंवा उपयुक्त प्रकारात मोडणारं असो... त्याच्या निर्मितीमागे विचार असावा तो वाचकाचा. लेखकाचा 'लेखन-ऐवज' त्या-त्या लेखन प्रकाराला योग्य अशा स्वरूपात सादर केल्यास वाचकांना ते लिखाण वाचणं सोयीचं जातं. विशेषतः पुस्तकात 'वाचन- सुलभता' [...]