rohanDisha

Reading Time: 6 Minutes (609 words)

फॉन्ट साइज वाढवा

‘रोहन प्रकाशन’ने आपली माहिती देणारी पहिली वेबसाइट उभारली ती २००७ साली. त्यानंतर २०१०मध्ये ती काळानुरूप अपग्रेड करून नव्या स्वरूपातील इ-कॉमर्स वेबसाइट सुरू केली. २०१७ साली रोहन प्रकाशनाने आपलं हाऊस मॅगझिन सुरू केलं – ‘रोहन साहित्य मैफल’. हे मासिक लोकप्रिय झालं असून, या अंकाचा आस्वाद वाचक गेली चार वर्षं आवर्जून घेत आहेत. 

गेल्या काही वर्षांत इ-बुक्स हे वाचनाचं नवं माध्यम लोकांपुढे आलं असून  रोहन प्रकाशनाने आपली काही पुस्तकं ‘इ-बुक्स’ स्वरूपात अमेझॉनवर उपलब्ध केली आहेत. 

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या प्रसारणामुळे एकूणच काळ बदलला आहे. वाचनाच्या सवयी बदलत आहेत. फेसबुक, Whatsapp यांसारखी अनेक समाज माध्यमं, इंटरनेटवरचे OTT प्लॅटफॉर्म्स यांचा आपल्या दैनंदिन जीवनात चांगलाच शिरकाव झालेला आहे. या सगळ्या बदलांचा प्रकाशक म्हणून विचार करताना आपणही काही वेगळे प्रयोग करावेत असं प्रकर्षाने जाणवत होतं. ही नवी वेबसाइट हे त्याचंच फलित!

मैफल EXCLUSIVE

या नव्या स्वरूपातील वेबसाइटविषयी सांगायचं, तर ही वेबसाइट पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन ठेऊन साकारली आहे. ‘रोहन साहित्य मैफल’ची ही जणू विस्तारित डिजिटल आवृत्ती होय. आमच्या पुस्तकांची सविस्तर माहिती, त्यांच्यावरील सवलती, सोयीस्कर खरेदीची सुविधा यांबरोबर वाचनीय मजकूरही इथे असणार आहे. ‘मैफल EXCLUSIVE’ विभागात वैशिष्ट्यपूर्ण सदरं, विशेष लेख मान्यवर लेखक, तज्ज्ञ मंडळी, अभ्यासक, तसेच तरुण लेखकही  लिहिणार असून वाचकांसाठी ही एक पर्वणीच ठरावी. ही सदरं चार, आठ, बारा लेखांची असतील व साप्ताहिक, पाक्षिक, किंवा मासिक अशा प्रकारे ती प्रकाशित होत राहतील. वाचकांना दर आठवड्याला दोन-तीन नवे लेख वाचायला मिळतील. या प्रकारे वाचकांना उत्तम पुस्तकाबरोबर आपल्या लॅपटॉप किंवा मोबाइलवर सहजरीत्या वाचन करता येईल अशी उत्तम वाचन सुविधा रोहन प्रकाशन उपलब्ध करून देत आहे.

वेबसाइटचं वैशिष्ट्य आहे ते त्यातील लेख जे वेबसाइटसाठी खास लिहून घेतलेले असतील. एकंदर हा प्रवास Digital Publishing कडे जाणारा असेल.

नव्या युगात रोहन प्रकाशनाचा हा विस्तार एका वेगळ्या प्रकारचाच आहे. 

हे वाचन आपण आपल्या सवडीने करू शकता. आपल्याकडे किती वेळ उपलब्ध आहे, त्यानुसार आपण लेख निवडू शकता. कारण प्रत्येक लेख किती शब्दांचा आहे व साधारण त्याचा वाचन वेळ किती असेल हे प्रत्येक लेखासोबत नमूद केलेलं असेल. आपलं वाचन सोयीस्कर व्हावं (मोबाइलवरही) यासाठी लेखाचा फॉन्ट साइज मोठा / छोटा करता येणार आहे. त्याचबरोबर मोबइलवर वाचताना आपल्या डोळ्यांना व आपल्या आजूबाजूला असलेल्यांना त्रास होऊ नये म्हणून ‘नाइट मोड’ही दिला आहे.

रोहन प्राइम 

‘रोहन प्रकाशन’च्या नव्या  वेबसाइटवर काही विशेष बदल केले आहेत. रोहन प्रकाशन आपला आधीचा ‘बुक क्लब’ आता विस्तारित स्वरूपात वाचकांपुढे आणत आहे – रोहन प्राइम स्वरूपात. रोहन प्राइमचे सभासदत्व म्हणजे ‘प्रीविलेज’. वाचकांसाठी अनेक फायदे आणि एक EXCLUSIVE सर्विस! सर्व पुस्तकांवर असलेली २५ टक्के सवलत तर मिळेलच; पण त्याचबरोबर नव्या पुस्तकांसाठी प्रकाशनपूर्व सवलतीची सोयही या मेंबर्सना मिळेल. ज्यात विशेष सवलत तर असेलच त्या जोडीला रोहनच्या ‘गपशप दिलसे’! आणि अशा इतर अनेक कार्यक्रमांना फक्त प्राइम मेंबर्सना आमंत्रण दिलं जाईल. हे कार्यक्रम खास प्राइम मेंबंर्ससाठी आयोजित केले जातील. मेंबंर्सना नवीन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकावर त्या पुस्तकाच्या लेखकाची स्वाक्षरी असलेल्या प्रती उपलब्ध केल्या जातील, तसचं काही स्पर्धा घेतल्या जातील आणि असे बरेच उपक्रम हे प्राइम मेंबरसाठी केले जातील. ‘रोहन प्राइम’ ही खऱ्या अर्थानं वाचकाला विशेष ‘स्टेटस’ देणारी योजना आहे.

खास वेलकम सवलत :
रजिस्टर करा आणि मिळवा २५ टक्के सूट!

रोहन प्राइमचे सभासदत्व म्हणजे ‘प्रीविलेज’. वाचकांसाठी अनेक फायदे आणि एक EXCLUSIVE सर्विस!

‘डिजिटल कंटेंट’कडे प्रवास

अनेक अभिनव असे पैलू असलेली ही नवी वेबसाइट तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगतीशील आहे, आणि ती उभारताना वाचकांच्या दृष्टीने ती अधिक ‘युजर फ्रेंडली’ असेल याची दक्षता घेतली आहे. रोहनच्या सर्व पुस्तकांविषयी नीटपणे यादी जाणून घेणं, रोहनच्या लेखकांची माहिती मिळवणं, रोहन प्रकाशनच्या एकंदर दृष्टिकोनाची, कार्यपद्धतीची कल्पना येणं हे सर्व नव्या वेबसाइटमुळे सोपेपणाने साध्य होणार आहे, मात्र वेबसाइटचं वैशिष्ट्य आहे ते त्यातील लेख जे वेबसाइटसाठी खास लिहून घेतलेले असतील. एकंदर हा प्रवास Digital Publishing कडे जाणारा असेल.

तेव्हा, वाचकहो, ही वेबसाइट फॉलो करत रहा!

वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक पाऊल आहे, अशी मला खात्री वाटते. वाचनाची सवय बदलणं किंवा लावून घेणं तसंच तरुणांनाही वेगळ्या वाचनाकडे आकर्षून घेणं, यासाठी आम्ही निवडलेली ही नवी वाट सर्वांना स्वागतार्ह वाटेल, अशी अशा!

 – रोहन चंपानेरकर


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to cart


Comments(4)

  • Dr. Vikas Natu

  • 3 months ago

  छान उपक्रम. शुभेच्छा. आम्ही आपल्यासोबत आहोत.

  1. धन्यवाद! वेबसाइटचा आपण जरुर वापर करावा आणि त्यावरील सुविधांचा आनंद घ्यावा…
   -टीम रोहन

  • Umesh Zirpe

  • 2 months ago

  अतिशय नावीन्यपूर्ण , काळाशी सुसंगत आणि स्तुत्य उपक्रम. खूप खूप शुभेच्छा !

  1. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *