संपादकीय (दिवाळी अंक)
फॉन्ट साइज वाढवा वाचकहो…! गेला पावणेदोन वर्षांचा काळ आपणा सगळ्यांसाठी कठीण आणि विचित्रसा गेला आहे, जातो आहे. आजवर कधी विचारही केला नव्हता अशी गोष्ट या काळात घडली ती म्हणजे सक्तीने घरी बसणं! आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीत आणि पर्यायाने सवयींमध्ये बरेच बदल झाले आहेत; कमी-अधिक प्रमाणात आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं, घेत आहोत. यामुळे आपल्या वाचन-सवयीदेखील बदलल्या [...]