दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष : संपादकीय
फॉन्ट साइज वाढवा २९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. कथा-कादंबरी व अनुभवपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत गांभीर्याने लेखन करणाऱ्या या लेखकाच्या स्मृतिदिनानिमित्त रोहन प्रकाशनच्या 'मैफल EXCLUSIVE !' या वाचन-प्लॅटफॉर्मवर आज आम्ही लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांचा दिबांवरील दीर्घलेख प्रकाशित केला असून, त्याबरोबरच दिबांचे नातू, प्रसिद्ध दिग्दर्शक [...]