फॉन्ट साइज वाढवा

२९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. त्या निमित्ताने लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला हा दीर्घलेख…
वाचनसोयीसाठी आम्ही इथे हा लेख चार भागांत प्रकाशित करत आहोत. पुढील भागांची लिंक त्या भागांच्या शेवटी दिलेली आहे.

३. मोकाशींची लेखन भूमिका

‘लोकल गाडीच्या खिडकीशी मी बसलो आहे. लोकल मुंबऱ्याच्या खाडीला धरून जात आहे. खाडीच्या नितळ पाण्यावर चंद्र उगवला आहे. अधेमधे एखादी शिडाची नाव अधांतरी तरंगल्यासारखी उभी आहे. माझं मन विलक्षण उल्हसित होत आहे. समोरील देखाव्यांतून ऊर्मी येऊन मला भारावून टाकीत आहेत. मी डोळे मिटतो नी एखाद्याा कथेचं सोडलेलं सूत्र डोक्यात उलगडू लागतं. कथेची आरंभीची वाक्यं मी स्वत:शी म्हणू लागतो. अधले-मधले प्रसंग वर्णू लागतो. मग वही काढून त्यावर भराभर टिपणं सुरू होतात. खाडी मागं पडते. पुढचं स्टेशन येतं आणि जातं.
कल्याण-मुंबई अशा त्या वर्षात माझ्या किती खेपा झाल्या. किती टिपणं काढली, कोणती कथा केव्हा सुचली- या गोष्टी स्मरणाबाहेर गेल्या आहेत.पण प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत असता बाकावर बसल्या बसल्या एखादी कल्पना येताच वही काढून ती टिपून ठेवणारा मी मला स्पष्ट दिसतो. माझ्यासारखे दुसरे धंदेवाले नेहमी माझ्याप्रमाणे मुंबईला जात. तेही वही काढून झालेला खर्च टिपत- पडताळा काढीत बसत. हे नेहमीचं दृश्य होतं. माझ्या वहीत मी काय टिपतो, ते कुणी पाहिलं असतं, तर मला वेड्यातच काढलं असतं.’ (पहिली पावलं, सत्यकथा जानेवारी १९६४)

२०१० साली बदलापूरमध्ये घेतलेल्या घरात काही काळासाठी मला राहायला मिळालं. तेव्हा बदलापूर ते मुुंबई या रेल्वे प्रवासात मोकाशींनी वरील परिच्छेदात उल्लेख केलेल्या निसर्गाच्छदित भागाच्या निम्मा तरी उरला होता का, हे माहिती नाही, पण या प्रवासात माझे दशकातील सर्वोत्तम वाचन झाले. हारुकी मुराकामी या जपानी लेखकाच्या साहित्याचा परिचय या प्रवासातच सुरू झाला. दोन-तीन डझनांवर अमेरिकी लेखक याच प्रवासात पिंजून काढले. आफ्रिकी लेखकांचा (सर्वाधिक नायजेरियन) परिचय झाला. या काळात बदलापूरच्या ‘ग्रंथसखा’ वाचनालयाचाही सभासद झालो. ठाण्यात आठवड्यातून एकदा जाणे होत असल्याने तेथले वाचनालयही बंद केले नाही. साठोत्तरीतील मराठी लेखनाचा फडशा पाडत असतानाच बदलापूरच्या एका रद्दीवाल्याकडे अरविंद गोखले यांनी संपादित केलेला दि.बा. मोकाशी यांचा संग्रह सापडला. दहावीच्या सुट्टीत वाचलेले मोकाशी एक तपानंतरही आपल्याला तितकेच आवडतात का, हे पाहण्यासाठी त्या संग्रहातील दोन डझन कथा वाचायला घेतल्या आणि एक-दीड प्रवासातच त्या पूर्णपणे वाचून काढल्या. मधल्या बारा तेरा वर्षांत पानवलकरांच्या कथांशीही गट्टी झाली होती. सदानंद रेग्यांपासून आनंद साधल्यांपर्यंत आणि भाऊ पाध्यांपासून दि.पु. चित्रेंचे कथात्म लेखन पचवून झाले होते. विद्यााधर पुंडलिकांपासून मधल्या दशकांतील लोकप्रिय आणि अ-लोकप्रिय लेखकांच्या, दुर्लक्षिलेल्या गेलेल्या लेखकांच्या साहित्याचे वाचन झाले होते. मात्र मोकाशींच्या कथेबाबत पुर्नवाचनातूूनही आनंदच मिळत असल्याचे लक्षात आले होते.

पुण्यात रेडिओ रिपेअरिंगचे दुकान थाटून स्थिरावण्याआधी मोकाशींनी मुंबईत बराच काळ काढला. रेडिओ मॅकेनिकचे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. पण गोडी आणि ओढा साहित्याकडे होता. चाळीत वऱ्हांड्याला टेकून वाचलेल्या पुस्तकांमुळे आपण लिहायला लागलो की प्रिन्स बिस्मार्कचे चरित्र त्यास कारणीभूत ठरले, हे नक्की आपल्याला आठवत नसल्याचे मोकाशींनी लेखात म्हटले आहे. चाळीतील एका शेजाऱ्याने मोठ्या पेटाऱ्यातून पुस्तकं काढून दिली. तेव्हा ती रासभर पुस्तकं पाहून लेखन मनात रुजलं की नाथमाधवांच्या कादंबरीतील एखाद्या प्रकरणाच्या ‘धूम धाड धाड धाड’ अशा सुरुवातीनं मनात बीज पडलं, याचा धांडोळा ते अनेक वर्षे घेत होते.

‘अनंता’ या शीर्षकाची कथा आपले पहिले लेखन असल्याचे मोकाशींनी नमूद केले आहे. एक गरीब मुलगा पोटासाठी अनेक नोकऱ्या करतो. सिनेमा ऑपरेटरचा असिस्टण्ट होतो.सायकल दुकानांत राहतो. पण सर्वच जण त्याला फुकट राबवून घेतात. शेवटी एका श्रीमंत विधवेकडे त्याला काम मिळतं. ती त्याला ठेवून घेते, असे काहीसे त्याचे कथानक होते. ही कथा लिहून झाल्यानंतर ती त्यांना प्रभाकर पाध्यांना वाचायला दिली. अभिप्रायासाठी कित्येक दिवस कल्याणहून मुंबईचे हेलपाटे घातले. अखेर वाचल्यानंतर पाध्यांनी ती चांगली वठल्याचे सांगितले. त्याकाळातही आपली कथा इतर कथा आणि कथाकारांपेक्षा वेगळी आहे, तिची रचना आणि स्वरूप समकालीनांसारखे नाही, याचा आत्मविश्वास मोकाशी यांना होता. तरी सुरुवातीच्या प्रसिद्ध १५ कथा त्यांनी प्रकाशनासाठी नाकारल्या. अगदी सत्यकथेत आलेल्या कथांबाबतही त्यांनी हेच धोरण ठेवले. त्यांच्या समकाळात लिहिल्या जाणाऱ्यात कथांची सुरुवात ‘सहस्रारश्मी उगवला होता, पक्षीगण भूपाळी म्हणत होते.’ अशा वाक्यांनी होत असे, हे मोकाशींनी मुद्दाम नोंदविले आहे. मराठीत आपली शैली सरधोपट असल्याची जाणीव कित्येक लेखकांना आरंभी काळातही होत नाही. मग ते अखेरीपर्यंत सरधोपट, क्लिशे शैलीपलीकडे लिहीत नाहीत. मोकाशींना सरधोपट लिहायचे नव्हते. त्यांनी साहित्यातील सरधोपट भाषा आधीच जोखाळली असल्यामुळे त्यांच्या कथा या भिन्न पोत, शैली आणि आशयाच्या निपजल्या.
‘नवकथेसारखा त्या वेळी पुरोगामी पंथ होता. त्याबद्दल कधी बोललेलं मला स्मरत नाही. मला इतर कथांतही रस नव्हता. माझ्याबरोबर जे लेखक लिहीत होते, त्यांचीही मला कल्पना नव्हती. कधी कुणाचं वाचल्याचं मला आठवत नाही. मला फक्त कथा लिहायच्या होत्या. कथा.’ ही त्यांची लेखनाबाबतची भूमिका होती.

सत्यकथेतील पाच पानांच्या लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘शब्दांनी मला कमी त्रास दिला नाही. सांगण्याचा आशय आणि शब्द या दोन आघाड्यांवर लढताना आरंभीच्या दिवसांत त्रेधा उडते. लेखनासाठी मी पुष्कळ मेहनत घेतली. अर्थात ‘पुष्कळ’ हा शब्द फसवा आहे. माझ्याहून कमी किंवा जास्त कष्ट पडलेले लेखक निराळा शब्द वापरतील. त्यावेळी मी एक-एक कथा सहा-सहा वेळा लिहिलेली आठवते. मला नेहमीच साधं लिहावंसं वाटे. तो माझा स्वभाव होता. उपमा, अलंकार आणि प्रतिमा यांनी मला गुदमरून गेल्यासारखं होई. खांडेकरांचं लिखाण मी थोडंसंच चाळलं होतं, त्याची ही प्रतिक्रिया असावी असं मला वाटतं. त्या तऱ्हेच्या लिखाणाचा तेव्हाही माझ्यावर प्रभाव पडला नाहीच. उलट ते सगळं मला फसवं वाटलं. साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता. निदान तसा प्रयत्न तरी करायचं मी ठरवलं.’
मोकाशींच्या वाचनाबाबतही या लेखात तपशील सापडतात.

‘वाचनसुद्धा शिकायचं असतं. युरिपीडीस, सोफोक्लीस, अॅरिस्टोफेनिस इत्यादी नाटककार मी वाचले. खरं सांगायचं म्हणजे. त्यांचं काही कळलं नाही.पण माझ्या पद्धतीप्रमाणे मी वाचत राहिलो. न कळलेलं पुस्तक मी पुन्हा कधी वाचलं नाही. किंबहुना एकदा वाचलेलं मी पुन्हा कधीच वाचलं नाही. नाटकांना कंटाळलो, इतर पुस्तकं वाचायला घेतली. जसजसा काळ जाऊ लागला, तसतसं लेखकाला काय सांगायचंय हे कळू लागतं. केवळ वाचनानेच स्वत:ची प्रगती होत नसते. तर इतर विविध अनुभव आपण घेतो, त्या अनुभवांतून ‘कळण्या’ची क्रिया होत राहते. पुष्कळदा आरंभीच्या लिखाणात न कळलेल्या भावना आपण लिहून जातो. तो भाग काही वर्षांनी वाचताच आश्चर्य वाटतं. त्या वेळी कॅमेरासारखा आपण तो भाग टिपलेला असतो. त्यांतील खरा अर्थ अनुभव आल्यावर प्रतीत होतो. आपण या वेळी आपलेच वाचक बनतो. मला आठवतं डोस्टोव्हस्की तेव्हा मला रुचला नव्हता. चेकॉव्ह. पुष्किन पुढेपुढे हेमिंग्वे आणि लॉरेन्स हे मला आवडले. टॉलस्टॉयची वॉर अॅण्ड पीस माझ्या बराच काळ लक्षात राहिली होती.’
मोकाशींची कथा वेगळी का घडली, याचे तपशीलच वरील परिच्छेदातून लक्षात येऊ शकतील.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचा चवथा भाग

मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (४)

४. ‘दिठी’उत्तर काळातील मोकाशी…

दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

लेख वाचा…


– या दीर्घलेखाचे मागीत तीन भाग –

D.B. Mokashi
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१)

१. एक गमावलेले दुर्मीळ पुस्तक…

चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२)

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद./p>

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३)

३. मोकाशींची लेखन भूमिका

साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.

लेख वाचा…


लक्षणीय कादंबर्‍या

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर


लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

गाइड


आर. के. नारायण
अनुवाद : उल्का राउत 


आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.
एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं?
एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?
मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?
यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्‍या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!


200.00 Read more

चेटूक

विश्राम गुप्ते त्रिधारेतील पहिलं पुस्तक


विश्राम गुप्ते


वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला…
म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
जागतिक वाङमयात अभिजात ठरलेल्या अॅना कॅरनिना व मादाम बोव्हारी या कादंबऱ्यांची बरीच कथन वैशिष्ट्य यात एकवटलेली दिसली, तरी ‘चेटूक’चा प्रवास हा समांतरपणे होताना दिसतो. तीत प्रीती म्हणजे काय? ती शारीर कि अशारीर? केवळ भावुकतेवर मानवी व्यवस्था सुफल होऊ शकते का? असे प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत.
गुतंवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी चेटूक…


395.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *