गॅजेट्सच्या दुनियेत! – लेखमालिकेविषयी….

गॅजेट्सच्या दुनियेत! सध्या आपलं आयुष्य तंत्रज्ञानान वेढलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो. एआय, व्हीआर, रोबोटिक्स यांचा वापर वाढला तर त्याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल हा अंदाज गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञांनी वर्तवला होता. याच तंत्रज्ञांनावर आधारित काही कल्पनेच्या पलिकडची हटके गॅजेटस आपण जाणून घेणार आहोत, 'गॅजेट्सच्या [...]

नॉट शंभर, तरी एक नंबर – लेखमालिकेविषयी….

क्रिकेट हा जसा जवळपास सर्वच भारतीयांसाठी प्राणप्रिय विषय आहे, तसाच माझ्यासाठी सुद्धा आहे. कळायला लागलं त्या वयात एक खेळी पाहून प्रचंड भारावून गेलो. जसजसा मोठा होत गेलो, तसतसे त्या खेळीमधील अधिक बारकावेदेखील समजत गेले. ती खेळी पाहतानाच एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली होती; नेहमीच शतक पूर्ण होणं महत्त्वाचं नसतं, एखादी खेळी त्याहूनही दिमाखदार आणि अविस्मरणीय [...]

वाह! क्या ‘सीन’ है – लेखमालिकेविषयी….

प्रसंग १: संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडीतले आनंदजी शाह एक दिवस प्रेमभंग झालेल्या आपल्या मित्राची कथा गीतकार इंदीवर यांना ऐकवत होते. प्रेमाच्या आणाभाका घेऊन एका मुलीने आनंदजींच्या मित्राला फसवलं होतं. "ये कस्मे, ये वादे, ये प्यार वफा सिर्फ बाते होती है, और कुछ नहीं", आनंदजी शेवटी हताश होऊन म्हणाले. "व्वा आनंदजी, काय बोललात. तुमची हरकत नसेल, तर [...]

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (१)

संध्याकाळी ७ वाजता स्ट्युटगार्ट स्टेशनवर गाडी थांबली. दोन हातात दोन बॅगा आणि काखोटीला तंबोरा घेऊन मी स्टेशनवर उतरले. सामान उतरवताना न विचारता, आपण होऊन एक दोघांनी मदत केली. मी ‘थँक्यू’ म्हटलेलं ऐकायची वाट न पाहता ते कुठे पसार झाले, कळलंही नाही. तेवढ्यात दुरून धावत हेल्गा आली. हातात तंबोरा आणि युरोपियनांच्या तुलनेत वाटणारा निमगोरा रंग यामुळे [...]

सर्जनाचे ‘स्थळ’ (‘पेन’गोष्टी – नवं सदर)

रात्रीची वेळ आहे... सगळा आसमंत शांत झोपला आहे... आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे... आत शांत शांत वाटतं आहे... अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं... आधी त्यावरून हात फिरवून माया करावी... पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात... मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा... त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी... आपल्या [...]

एकला ‘सोलो’रे

घराघरात बालपणापासून वाचनाचा आग्रह सुरू होतो. मला मनापासून वाटतंकी,ज्ञान, बुद्धिमत्ता आणि जाणिवा विस्तारणाऱ्या या वाचनासोबत,आत्मविश्वासपूर्ण आणि माणुसकी आत्मसात केलेली पिढी भविष्यात पाहायची असेल, तर आज प्रत्येक मुलास त्याच्या उमलत्या वयापासून 'प्रवास' या जगण्याच्या सुंदर शक्यतेची प्रेरणा आपण द्यायला हवी. एका अनाहूत क्षणी मी सोलो सफर सुरू केली. सर्वांत दूरचा प्रवास मी आजपर्यंत कुठला केला असेल, तर तो माझ्या [...]

अरबस्तानच्या अनवट वाटा (नव्या सदराबद्दल)

फॉन्ट साइज वाढवा नमस्कार वाचकहो, मी आशिष काळकर. पेशाने वास्तुविशारद.२००६ साली कामाच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिराती या देशात पाऊल पडलं ते आजतागायत. हा देश म्हणजे एक विचित्र रसायन. १९७१ साली ब्रिटिशांनी या भागातून काढता पाय घेतला, तेव्हा इथल्या किडूकमिडूक सहा प्रांतांचे राजे शेख झाएद यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. अरबांमध्ये एकत्र येणं तसं दुरापास्तच, पण इथे [...]

मंझिल से बेहतर… हैं रास्ते! (नवं सदर)

फॉन्ट साइज वाढवा माणूस हा प्राणी फार इंटरेस्टिंग आहे. विचार करण्याची, निर्मितीची, सर्जनाची देणगी लाभलेला माणूस परिस्थितीनुरूप बदलतो, कधी आपल्या सोयीनुसार परिस्थिती बदलतो, पुढे पुढे जाण्याचा मार्ग काढत राहतो, सहजी हार मानत नाही. किती माणसं आजूबाजूला दिसतात, जी चाकोरी सहज बाजूला सारून देतात, ठरलेल्या रस्त्यांकडे पाठ फिरवून, नवे मार्ग धुंडाळतात, किंवा चाकोरी स्वीकारूनदेखील त्यात स्वतःच्या [...]

कलावादिनी (नवं सदर)

फॉन्ट साइज वाढवा केवळ भारतीयच नाही, तर जागतिक व्यासपीठावर आज भारतीय संगीत-नृत्याची ठसठशीत मोहोर उमटलेली आहे. किंबहुना भारताचा समृद्ध कलावारसा म्हणून जगभरात आज भारतीय संगीत-नृत्याकडे अभिमानाने पाहिलं जात आहे. मात्र याच ‘समृद्ध’ भारतीय कलावारशाला अगदी आताआतापर्यंत, म्हणजे पाऊणशे ते शंभर वर्षांपर्यंत अगदी हीन लेखलं जात होतं. भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक असा या गायन-नृत्याकडे पाहण्याचा तथाकथित पांढरपेशा समूहाचा [...]

नितळ (नवं सदर)

फॉन्ट साइज वाढवा अनेकदा समाजात आपण अनेक गोष्टींवर सोयीस्कर मौन धारण करतो. पुष्कळदा सामाजिक नियम असल्यागत लोक त्यांची कधीच वाच्यता करताना दिसत नाहीत. यामध्ये अनेक विषय असतात, केवळ परंपरेच्या ओझ्याने मौन धरलेलं असू शकतं किंवा अज्ञानामुळे. पण अनेकदा असे विषय माध्यमांकडून, विचारवंतांकडून आणि समाजाकडून उपेक्षिले जातात. आणि मग त्यावाचून बरेच अडते हे निश्चित! अशा विषयांना [...]