क्रिकेट हा जसा जवळपास सर्वच भारतीयांसाठी प्राणप्रिय विषय आहे, तसाच माझ्यासाठी सुद्धा आहे. कळायला लागलं त्या वयात एक खेळी पाहून प्रचंड भारावून गेलो. जसजसा मोठा होत गेलो, तसतसे त्या खेळीमधील अधिक बारकावेदेखील समजत गेले. ती खेळी पाहतानाच एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली होती; नेहमीच शतक पूर्ण होणं महत्त्वाचं नसतं, एखादी खेळी त्याहूनही दिमाखदार आणि अविस्मरणीय असू शकते.
ज्या खेळीमुळे ही गोष्ट मनःपटलावर अधोरेखित झाली, त्या खेळीविषयी मत मांडलं आहेच, मात्र इतरही अशाच काही शतक झालेलं नसूनही भन्नाट ठरलेल्या खेळींचं वर्णन तुम्हाला या मालिकेत वाचायला मिळेल. शंभर धावा पूर्ण झाल्या नाहीत, मात्र तरीही ‘शंभर नंबरी सोनं’ असणाऱ्या या काही अप्रतिम खेळींविषयी थोडंसं…’नॉट शंभर, तरी एक नंबर…’
– ईशान पांडुरंग घमंडे
(लेखक क्रिकेटचे चाहते आणि अभ्यासक असून सध्या एका अॅड एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम करत आहेत. वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखन केलेलं असून निरनिराळ्या प्रकारचं लेखन करण्याचं त्यांचं स्वप्न आहे.)
या लेखमालिकेत पाच लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1.नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!
2.नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!
3.नॉट शंभर, तरी एक नंबर – सुपर्ब नाईन्टीज!
4.नॉट शंभर, तरी एक नंबर – एक धाव कमी पडली आणि…
5.नॉट शंभर, तरी एक नंबर – ९८ > १००