फॉन्ट साइज वाढवा

चावटी आणि सभ्यटी…

बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली. जर हे दोन्ही लेखक आजच्या करोना काळात असते, तर त्यांनी लिहिलेल्या कशा उतरल्या असत्या हे पडताळून पाहण्याचा एक प्रयत्न म्हणून या दोहोंच्या शैलींचा वापर करून एकच कथा दोन पद्धतीने सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. एकीला आपण चावटी म्हणू, तर दुसरीला सभ्यटी.


चावटी :
भोपळ्यांची शेती पाहणारा भाजीवाला…
आरंभ : सार्‍या अंतर्वस्त्रांची ताणपट्टी (इलॅस्टिक) टाळेबंदीच्या काळात खराब झाल्यामुळे व्यथित झालेल्या भाजीवाल्याची ही कथित गोष्ट. त्याच्यामते टाळेबंदी त्याच्यामुळे नष्ट झाली.

कथा : आत्मनिर्भतेच्या घोषणेनंतर आमच्या संकुलाच्या बाहेर आधीच असलेल्या नऊ भाजीवाल्यांच्या रांगेत दहावी टोपली घेऊन नच्चू गोडू नावाचा एक नवा भाजीवाला दाखल झाला. थाळ्या वाजविण्याच्या आणि दिवे लावण्याच्या दोन्ही काळांत नच्चू गोडू त्याबाबतचा आदेश देणार्‍याच्या नावे शिव्यांनी ठणाणा करीत होता. कारण मात्र जगावेगळे होते. नोकरी गेली, महिन्याचा पगार गेला, बँकेतले पैसे हळूहळू किराणा मालावरच संपू लागले. त्याची त्याला किंचितही चिंता नव्हती. पॅण्ट घातली, लुंगी घातली किंवा काही घातले, तरी ताणपट्टी खराब झालेली अण्डरपॅण्ट खाली येत होती, याचे त्याला सर्वात दु:ख होत होते. बायको, मुले इतकेच काय शेजारी-पाजार्‍यांनीही त्याच्या अण्डरवेअर खाली येण्याच्या घटना पाहून खिल्ली उडवली होती. मोबाइलवर पोर्न पाहताना, टीव्हीवर मालिका पाहताना आणि ओटीटी सिरीज पाहतानाही या सतत होणार्‍या खिल्लीमुळे त्याला आनंद मिळत नव्हता. अण्डरवेअर ही अत्यावश्यक सेवेत का मोडत नाही,याचा तो विचार करीत होता.
रेल्वेबंद, रिक्षाबंद, दुकाने बंदचा शंभरावा दिवस आला, तेव्हा त्याने संकुलात भाजीची टोपली लावायला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून भाजी खरेदीसाठी येणार्‍या बायका त्याच्यापुढे वाकताना पाहताना त्याला कसनुसे झाले. तब्बल सत्तर टक्के बायका उन्हाळ्याला कंटाळल्या होत्या, की त्याच्या सारख्याच ताणपट्टी खराब होण्याच्या शिकार झाल्या होत्या याचा पडताळा त्याला घेता येईना. पण काही दिवसांतच त्याच्या अंगात धीटपणा आला. संकुलातील विविध अदाकारी आणि विविध आकारी स्त्रियांना भाजी देताना तो डोळ्यांत साठवू लागला. त्याच्या मेंदूच्या हार्डडिस्कचा डाटा त्यांनीच भरू लागला.
नंतर आणखी एक गंमत झाली. त्याच्या गळक्या अण्डरवेअरवर हसणारी बायको, मुले शेजारी-पाजारी यांच्याही अंडरवेअरच्या ताणपट्ट्या बाद झाल्याचे दाखले त्याला सापडू लागले. अन् त्यावेळी कुणीच कुणाला हसत नव्हते. सारेच खिल्ली उडविली जाण्याच्या समांतर अवस्थेत गेले होते. अन् त्यामुळेच एका दाढीवाल्या माणसाला टाळेबंदी संपवत नसल्याबद्दल शिव्या-शापांची लाखोली वाहत होते.
हळूहळू नच्चू गोडू संकुलातील बर्‍यापैकी बायकांचा आवडता भाजीवाला बनला. कोथिंबिरच जास्ती दे, मिरच्याच अधिक ओत, लसणाच्या मोठ्या मोठ्याच पाकळ्या टाक, वजन जास्ती भरले तरी पैसे माफक घे, भाभीणींना भाव करण्याची संधी दे, आंबे-फणस उत्तम काढून दे या त्याच्या गुणांमुळे दहावा भाजीवाला असूनही त्याची भरभराट झाली. शिवाय एक गोष्ट गंमतीशीर आणि सुखावह घडू लागली. दररोज रात्री त्याला भोपळ्याच्या शेतांची स्वप्ने पडू लागली. त्यांतील सगळ्या भोपळ्यांची आपण उत्तम देखरेख करीत असल्याचे स्वप्नात त्याला दिसू लागले. कित्येकदा भोपळे हाताळून त्यांना कुरवाळून, त्यांना आपल्या दोन्ही हातांत पकडून, त्यांचे स्वप्नांत त्यांनी पापे घेतले होते. संपूर्ण जग हे या भोपळ्यांसाठीच बनले असून भोपळा हाच मोक्ष, भोपळा हाच स्वर्ग असे स्वप्नात असताना त्याचे तत्त्वज्ञान बनत होते.
एके दिवशी बातम्या पाहताना त्याला दाढीवाला मसिहा ‘तुम्हाला काय दु:ख आहे, ते माझ्या ट्विटर हॅण्डलवर कळवा’, असे सांगताना पाहिला.
त्याच दिवशी संध्याकाळी त्याने सेल्फीद्वारे गुपचूप आपल्या गळत्या अण्डरवेअरचा व्हिडीओ मसिहा कार्यालयाला पाठवला. तो व्हिडीओ अर्ध्याच तासात जगभर व्हायरल झाला. अन् दुसर्‍याच दिवशी टाळेमुक्तीचा आदेश आला. नच्चू गोडूने घरात, आजूबाजूच्या भाजीवाल्या मित्रांत आणि आपल्या अनेक गिर्‍हाइकांत टाळेबंदी हटवण्यास आपणच कारणीभूत असल्याची चर्चा केली आणि तो पूर्वीपेक्षा अधिक खिल्लीचा विषय बनला. पण टाळेबंदी हटल्यानंतर सारीच दुकाने उघडल्यामुळे त्या खिल्लीकडे त्याने दुर्लक्ष केले. नजीकच्या इनरवेअरच्या दुकानांमध्ये त्याने सर्वाधिक गर्दी पाहिली. त्या गर्दीतून वाट काढत तो दुकानदारासमोर पोहोचला तेव्हा त्यांच्या स्टॉकमध्ये असलेल्या ११ अण्डरवेअर त्याने खरेदी केल्या. त्याच्या मापाच्या तेवढ्याच तिथे उरल्या होत्या. पुढे पुन्हा टाळेबंदी लागली तर काय या भीतीने त्याची इन्व्हेसमेण्ट होती ती.
दुसर्‍या दिवसापासून नच्चू कडू ‘ये आराम का मामला है’ असे मनात म्हणत भाजी विकू लागला. पण सार्‍या जगात काहीतरी बदलले आहे अशी जाणीव त्याला व्हायला लागली. त्याचा रोजचा आनंद, रोजचे सुख कुणीतरी हिरावून घेतल्याची शंका त्याला यायला लागली. त्यामुळे आधी होता त्याच्या बरोबर उलट तो वागायला लागला.  
 त्याची गिर्‍हाइके त्याच बायका होत्या, ज्या लॉकडाऊनमध्ये त्याच्याकडे सारख्याच कोनात वाकून भाजी घेत होत्या. त्या तितक्याच प्रमाणात भाजी खरेदी करीत होत्या. त्याच्या नफ्याचा आलेख चढाच होता. (करोना निघून गेल्यानंतरही कुठे नोकरी चाकरी न करता आयुष्यभर भाजीच विकायचा निर्धार त्याने केला होता.)  
त्याचे काय बिनसले ते त्यालाच कळत नव्हते पण संकुलातील त्याच भाभ्या, आँटी, मौसीशी त्याची आता भांडणे घडू लागली. मापात तो पाप करतो, असा त्याच्यावर आरोप व्हायला लागला. हे त्याचा धंदा बंद पडेस्तोवर कायम राहिले.
काही काळानंतर मानसोपचार तज्ज्ञाकडून ऑनलाइन उपचार घेताना तो त्यांना आपल्या दु:स्वप्नांची एकच मालिका दरवेळी सांगत होता.
त्याच्या स्वप्नांत म्हणे दररोज उद्ध्वस्त झालेल्या शेताचे चित्र कायम येत होते. त्यात भोपळे कुठेच नव्हते.


LITOC-cover

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या

एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?

250.00Add to cart


सभ्यटी…
भोपळ्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा…
फाल्गून मास संपत आला. वसंताची पूर्वचिन्हे दिसू लागली. बहुतेक वृक्षवेलींनी आपल्या जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन सुंदर सुंदर रंगांची वस्त्रे परिधान केली व काही करीत आहेत. जणु काय युवयुवती एखाद्या समारंभास जाण्यासाठी नटून तयार झाल्या आहेत. पण आमच्या इथल्या संकुलातील घराघरांत जणु काही सुतक असल्याचं वातावरण आहे. ट्रेन बंद, रिक्षा-टॅक्सी बंद, दुकाने-मॉल बंद. त्यामुळे दोन महिन्यांत साधी साडी-चोळी खरेदी नाही की इवलीशी चिंधी. रिबिनी, दुपट्टा,फॉल,क्लिपा सगळ्याच जुन्या. कपडे सगळेच जुने आणि काचोळ्या? त्यांची वासलात लागल्यामुळे वन्संच्या पाया पडून पडून मी अब्रू वाचविली. पण वन्संनी त्या गोष्टीचा बोभाटाच केला. मग आमच्या शेजारीण हेमांगीताईने त्यावरून कवितेतून माझी खिल्लीच उडविली. इश्श, मास्क असूनही किती लाजले मी सोसायटीतल्या सर्व बायकांदेखत.
संकुलात एक नवा भाजीवाला बसतो, नच्चू गोडू नावाचा. ज्याच्याकडच्या भाज्या सर्वांत ताज्या असतात. टोमॅटो, लिंबू, ढब्बू मिरची, भोपळी मिरची आणि मला सर्वांत प्रिय शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळापण.
त्या दिवशी हेमांगीताईसोबत भाजी घेत असताना ताईने लांबूनच मला त्याच्या नजरेतील ओंगळपणा दाखवून दिला. तेव्हापासून त्याच्याकडे भाजी घेण्याचे मी टाळायलाच लागले.
कशी असतात एकेक लोक. साळसूदपणे आपला कार्यभाग साधून घेतात. पाप, नीतीमत्ता यांना कोण शिकविणार? लहानपणी संस्कारच नसले की असेच होणार.
नच्चू गोडूविषयी हेमांगी ताईने सावध केले नसते तर, या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा येतो. माझे स्त्रीधन हे पतीखेरीज कुणी पाहिले, तर जागच्या जागी मज मृत्यूच यावा.
दिवस जसे जात आहेत, तसे नच्चू गोडूबद्दलच्या बायकांच्या आपापसात तक्रारी वाढत आहेत. शिवाय त्याने म्हणे पंतप्रतिनिधींसमोर एका गोष्टीचे गार्‍हाणे मांडले आहे. वन्सं आणि हेमांगीताई ते मोबाइलमध्ये सारख्या सारख्या पाहत त्यावर खिदळत होत्या. पण मी जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा मला बाई एकटीलाच त्यावर कणव आली.
दुसर्‍या दिवशी घड्याळ तपासून भाजी आणायला उतरले तर नऊच्या नऊ भाजीवाल्यांकडचे भोपळे आणि शेवग्याच्या शेंगा संपल्या होत्या. नच्चू गोडूकडेच हा ऐवज शिल्लक होता. न वाकता तो कसा घेणार हा, माझ्यापुढे यक्षप्रश्नच होता. मग मी त्याच्याकडे पिशवी टाकली. शेंगा, भोपळा घरी आणून देण्यास सांगितले.  
अर्धा किलो भोपळा आणि शेवग्याच्या नऊ शेंगा घेऊन नच्चू गोडू घरी आला. त्याला पाहून वन्स आणि जिन्यात असलेल्या हेमांगीताई जोरजोरात ओरडू अन् हसू लागल्या. हिरमुसल्या चेहर्‍याने विचारा नच्चू गोडू पैसे घेऊन परतला. अशी थट्टा करतात का कुणाची? असं वन्सला विचारल्यावर तिने आणि हेमांगीताईने आपले दोन्ही हांत नको त्या ठिकाणी नेऊन नृत्य करायला सुरुवात केली.
या घटनेनंतर दुसर्‍याच दिवसापासून नच्चूने अनेक बायकांशी भांडण उकरायला सुरुवात केली. ही भांडणे इतकी वाढली की, त्याला तेथून हाकलण्यास काही पुरुषांना मध्ये पडावे लागले.  
काही दिवसांनी नच्चू बसायचा त्या जागी त्याची बायको भाजीची टोपली घेऊन यायला  लागली. त्यानंतर रोजच आमच्या घरात माझ्या आवडीची भोपळ्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा बनू लागल्या.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचे पहिले दोन भाग

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(१)

१. कठीण समयांतील रम्यकथा

शतकांची, संस्कृतींची, भाषेची, प्रकृतीची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे ‘डेकॅमेरॉन’ आणि ‘चांदण्यांतील गप्पा’ हे दोन ग्रंथ मासले या लेखाचा मुख्य विषय…p>

लेख वाचा…


बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(२)

२. कठीण समयांतील सभ्यकथा…

फिटनेस मंत्रा, यशशास्त्राची पुस्तके पुढे दाखल झाली. नंतर बायंडिंग केलेल्या गठ्ठ्यांत पिवळ्या रंगाची पडलेली जुनी पुस्तके समोर लागली. त्यात मला काशीबाई कानिटकरांचा ‘चांदण्यांतील गप्पा’ हा कथासंग्रह गवसला. एप्रिल १९२१ साली प्रकाशित झालेला.p>

लेख वाचा…


लक्षणीय कथासंग्रह

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट


सतीश तांबे


‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून

गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो.

या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच250.00 Add to cart

घनगर्द

हृषीकेश गुप्ते


हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.

ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.

त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी

मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.

हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.

तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.

महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.

म्हणूनच त्याच्या कथांमध्ये

एक चैतन्य सळसळताना जाणवतं.

‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून

हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.

ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे

भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.

मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.

त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.

पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.

याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.

– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)340.00 Add to cart

शिन्झेन किस

शिंची होशी
अनुवाद : निस्सीम बेडेकर


शववाहिकेतून गायब झालेलं प्रेत,
स्मृतिभ्रंश करून टाकणारे अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर, पूर्णपणे रिकामी असलेली डिलक्स तिजोरी, मुलांना शिस्त लावणारे रागीट काका…
…जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !
अफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.
जपानी भाषेवर प्रभुत्व असलेले निसीम बेडेकर यांनी होशी यांच्या निवडक कथांचा थेट जपानी भाषेवरून मराठीत केलेला रसाळ अनुवाद…
`शिन्झेन किस’


195.00 Read more

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा


प्रणव सखदेव


माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”

बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!

मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’


225.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *