फॉन्ट साइज वाढवा

नमस्कार वाचकहो,

मी आशिष काळकर. पेशाने वास्तुविशारद.
२००६ साली कामाच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिराती या देशात पाऊल पडलं ते आजतागायत. हा देश म्हणजे एक विचित्र रसायन. १९७१ साली ब्रिटिशांनी या भागातून काढता पाय घेतला, तेव्हा इथल्या किडूकमिडूक सहा प्रांतांचे राजे शेख झाएद यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. अरबांमध्ये एकत्र येणं तसं दुरापास्तच, पण इथे मात्र भट्टी जमून आली. वर्षभरात अजून एक प्रांत या सहा जणांमध्ये सामील झाला आणि जन्माला आला सात ‘अमिरातींचा’ संयुक्त अरब अमिराती.

या सात जणांमध्ये आकाराने आणि अर्थकारणाने दादा असलेला अबू धाबी या सगळ्यांचा म्होरक्या झाला, जे स्थान तो आजवर राखून आहे. तेलसंपन्न अबू धाबी व्यतिरिक्त जगाच्या पाठीवर ‘स्वप्ननगरी’ म्हणून विख्यात झालेली ‘दुबई’ आणि आत्ता आत्तापर्यंत भारत-पाकिस्तान या दोन देशांमधल्या अनेक अविस्मरणीय क्रिकेट मालिकांसाठी स्मरणात असलेला ‘शारजाह’ या दोन अमिरातींनाही जगभर चांगलीच ओळख मिळाली… पण त्यांच्या तुलनेने बाकीच्या चार भावंडांना – अजमान , रास-अल-खैमा , फुजेरा आणि उम-अल -कुवेन यांना – विशेष वलय अजूनही मिळालेलं नाही. असं असलं, तरी सुरुवातीचे काही दिवस दुबई-अबू धाबी-शारजाह इथल्या डोळे दिपवणाऱ्या जागा बघून झाल्या, की इथे आलेल्या जवळ जवळ प्रत्येकाचे पाय या अपरिचित अमिरातींच्या दिशेने वळतात. या देशाचा खरा ‘बदाऊनी’ चेहरा शहरी चकचकाटापासून दूर गेल्यावर ठळकपणे जाणवायला लागतो आणि त्यातून अरबांचं जगावेगळं विश्व अनुभवता येतं.

‘अरबस्तानच्या अनवट वाटा’ या लेखमालेतून मी या सात अमिरातींमधल्या काही खास जागा आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. या जागा अपरिचित असल्या, तरी विलक्षण आहेत. या जागांची आपली एक खास कहाणी आहे. काही जागांना अतिशय उत्कंठावर्धक असा इतिहास आहे, तर काही जागांशी स्थानिक लोकांमध्ये गमतीशीर दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. अशा जागा, चालीरीती, दंतकथा यांचा मागोवा घेत त्यातून चित्रविचित्र माहिती गोळा करण्याचा माझा छंद मला आजवर जे जे अनुभव देऊन गेला आहे, तेच शब्दात मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

या देशात आल्यावर सुरुवातीच्या काळात एकटं राहत असताना अनेक विक्षिप्त लोक माझ्या परिचयाचे झाले होते आणि त्यातलेच काही जण माझ्या या भटकंतीत सामील झाले. हे वल्लीच माझ्या या अनुभवांच्या कथानकाचे नायक असणार आहेत. एखाद्या जागेशी संबंधित दंतकथा अथवा इतिहास स्थानिक लोकांकडून ऐकण्यात एक वेगळीच मजा असते… माझ्या कथानकांमध्ये त्यांचाही उल्लेख अधूनमधून येईलच! लोक आणि कथा चटकन समजत नाहीत, त्यांना नीट ‘वाचावं’ आणि ‘उमजावं’ लागतं, पण एकदा ते जमलं की त्यातून ‘अनुभवविश्व’ आकाराला येतं… या लेखमालेतून माझं ‘अनुभवविश्व ‘ तुम्हा वाचकांसमोर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

वाचकांना या अनुभव -चित्रणांमधून जे काही समजेल आणि उमजेल, त्याचं श्रेय अर्थातच त्या चित्रणाला सशक्त करणाऱ्या सगळ्यांचं आणि जर कुठे काही कमी पडलं, तर ते न्यून मात्र सर्वस्वी माझं…

– आशिष काळकर

(दुबईस्थित वास्तुविशारद असून अरबस्तानच्या सांस्कृतिक-साहित्यिक व राजकीय वारश्याबद्दल विशेष आस्था.)

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
अरबस्थानच्या अनवट वाटा


Dalma island

Dalma island

या लेखमालिकेतील लेख

डेल्मा

हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही…

लेख वाचा…


सर बानी यास

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…



टेहेळणी बुरु

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…


कसर-अल-मुवेज

डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’

लेख वाचा…


जझीरात अल हमरा

‘अल जझीरा अल हमरा – घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता चाळवली गेली…’

लेख वाचा…


फुजेरा

शेकडो वर्षांपासून याच जागी भरणारा हा बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा होती. इथं छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुईपासून ते जिवंत शेळ्या मेंढ्यांपर्यंत काहीही मिळू शकतं.’

लेख वाचा…


वासित वेटलँड सेंटर

दलदल असो वा वाळवंट, मनात आणलं तर कुठेही काहीही तयार करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जागा!

लेख वाचा…


कॉफी’ संग्रहालय

दलदल असो वा वाळवंट, मनात आणलं तर कुठेही काहीही तयार करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जागा!

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *